MI vs KKR Live Score, IPL 2024: मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव, कोलकाता प्लेऑफसाठी पात्र
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL Live Cricket Score and updates in Marathi: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलमधील 60वा सामना होत आहे. हा सामना फक्त औपचारिक असणार आहे. कोलकात्याने हा सामना जिंकला तर अधिकृतरित्या प्लेऑफसाठी क्वॉलिफाय होईल.

आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. या स्पर्धेत हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडणार आहेत. यापूर्वी वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात कोलकात्याने मुंबई इंडियन्सला पराभवाचं पाणी पाजलं होतं. कोलकात्याने विजयासठी फक्त 170 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण मुंबईचा संघ या धावाही करू शकला नाही. मुंबईचा डाव 145 धावांवर आटोपला. कोलकात्याने मुंबईचा 24 धावांनी पराभव केला. आता मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र येथून पुढे प्रत्येक सामना आत्मसन्मानासाठी खेळला जात आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. पावसामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाल्याने 16 षटकांचा होणार आहे. दोन्ही संघांना 16 षटकं खेळायला मिळतील.पॉवर प्लेचा खेळ 1-5 षटकादरम्यान होईल. या सामन्यात एकच गोलंदाजाला 4 षटकं टाकता येतील. तर चार गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटकं टाकू शकतात.
LIVE NEWS & UPDATES
-
KKR vs MI Live Score Updates : कोलकात्याने मुंबई इंडियन्सला पुन्हा केलं पराभूत
कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला दुसऱ्यांदा पराभवाचं पाणी पाजलं आहे. मुंबई इंडियन्सला 158 धावांचं आव्हान दिलं होतं मात्र मुंबईचा संघ 139 धावा करू शकला. या विजयासह कोलकाता प्लेऑफसाठी अधिकृतरित्या पात्र ठरलेला पहिला संघ ठरला आहे.
-
KKR vs MI Live Score Updates : नमन धीरची झटपट खेळी संपुष्टात, 6 चेंडूत 17 धावा करून बाद
नमन धीरने मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्याचा आटोक्यात प्रयत्न केला. मात्र हार्षित राणाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
-
-
KKR vs MI Live Score Updates : टिम डेविडने मोक्याच्या क्षणी विकेट दिली
टिम डेविडने संघाला खूप गरज असताना नांगी टाकली. फटकेबाजी करण्याची गरज असताना 0 धावा करून बाद झाला. आंद्रे रसेलने त्याला खातंही खोलू दिलं नाही.
-
KKR vs MI Live Score Updates : हार्दिक पांड्या पुन्हा फेल
हार्दिक पांड्या फक्त 2 धावा करून तंबूत परतला आहे. वरुण चक्रवर्तीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
-
KKR vs MI Live Score Updates : सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद
सूर्यकुमार यादव 14 चेंडूत 11 धावा करून तंबूत परतला आहे. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर रमणदीपने त्यााच झेल पकडला.
-
-
KKR vs MI Live Score Updates : रोहित शर्मा बाद
रोहित शर्माला बाद करण्यात वरुण चक्रवर्थीला यश आलं आहे. 24 चेंडूत 19 धावा करून बाद झाला.
-
KKR vs MI Live Score Updates : इशान किशन 40 धावा करून तंबूत
इशान किशनला बाद करण्यात सुनील नरीनला यश आलं आहे. 40 धावांवर असतांना फटका मारला आणि रिंकू सिंहच्या हाती झेल देऊन बाद झाला.
-
KKR vs MI Live Score Updates : रोहित शर्मा आणि इशान किशनची आश्वासक खेळी
रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी आश्वासक सुरुवात केली आहे. दोघांनी अर्धशतकी खेळी केली आहे.
-
KKR vs MI Live Score Updates : कोलकात्याच्या 16 षटकात 7 गडी गमवून 157 धावा
पावसामुळे 16 षटकांचा खेळ करण्यात आला आहे. कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 16 षटकात 7 गडी गमवून 157 धावा केल्या. तसेच विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं आहे.
-
KKR vs MI Live Score Updates : रिंकू सिंहला बाद करण्यात बुमराहला यश
रिंकू सिंहला बाद करण्यात बुमराहला यश आलं आहे. 12 चेंडूत 20 धावा करून तंबूत परतला.
-
KKR vs MI Live Score Updates : आंद्रे रसेलचा डाव 24 धावांवर आटोपला
शेवटच्या षटकात झटपट धावा करताना आंद्रे रसेलचा फटका चुकला. पियुष गोयलला षटकार मारताना चेंडू खूपच वर चढला आणि सीमेवर झेल पकडला. आंद्रे रसेल 24 धावा करून बाद झाला.
-
KKR vs MI Live Score Updates : नितीश राणा धावचीत होत तंबूत
कोलकाता नाईट रायडर्सची आंद्रे रस्सेल आणि नितीश राणा यांची जोडी जमली होती. मात्र नितीश राणा मोक्याच्या क्षणी धावचीत झाला.
-
KKR vs MI Live Score Updates : वेंकटेश अय्यर आऊट
पीयूष चावला याने सेट फलंदाज वेंकटेश अय्यर याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. पीयूष चावलाने वेंकटेशला सूर्यकुमार यादव याच्या हाती 42 धावांवर कॅच आऊट केलं.
-
KKR vs MI Live Score Updates : श्रेयस अय्यर माघारी
मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला तिसरा झटका दिला आहे. अंशुल कंबोज याने केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर याला क्लिन बोल्ड केलं. श्रेयसने 10 बॉलमध्ये 7 धावा केल्या.
-
MI vs KKR Live Score : कोलकात्याला दुसरा धक्का, सुनील नरीन बाद
बुमराहाने आपल्या गोलंदाजीचं पुन्हा एकदा दर्शन घडवलं. स्पर्धेत आक्रमक खेळी करणाऱ्या सुनील नरीनला शून्यावर बाद केले.
-
MI vs KKR Live Score : कोलकाता नाईट रायडर्सला पहिला धक्का
कोलकाता नाईट रायडर्सला फिल सॉल्टच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार मारला. पण पाचव्या चेंडूवर झेल बाद झाला. तुषाराने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
-
MI vs KKR Live Score : कोलकाता नाईट रायडर्सची प्लेइंग 11
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
कोलकाता नाईट रायडर्स इम्पॅक्ट प्लेयर्स: अनुकुल रॉय, वैभव अरोरा, सुयश शर्मा, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी
-
MI vs KKR Live Score : मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेयर्स: रोहित शर्मा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, मोहम्मद नबी, कुमार कार्तिकेय
-
MI vs KKR Live Score : नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने, खेळ फक्त 16 षटकांचा होणार
नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी घेतली. पावसामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाल्याने 16 षटकांचा होणार आहे. दोन्ही संघांना 16 षटकं खेळायला मिळतील.पॉवर प्लेचा खेळ 1-5 षटकादरम्यान होईल. या सामन्यात एकच गोलंदाजाला 4 षटकं टाकता येतील. तर चार गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटकं टाकू शकतात.
-
MI vs KKR Live Score : 9 वाजता होणार टॉस आणि 9.15 सामन्याला सुरुवात
पावसामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला आहे. आता 9 वाजता नाणेफेकीचा कौल होईल आणि 9.15 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
-
MI vs KKR Live Score : 8 वाजून 45 मिनिटांनी खेळपट्टीचं निरीक्षण होणार
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामना पावसामुळे लांबला आहे. पाऊस थांबला असून कव्हर्स हटवण्यात आले आहेत. 8 वाजून 45 मिनिटांनी खेळपट्टीचं निरीक्षण होईल. त्यानंतर टॉसचा निर्णय घेतला. षटकं कमी होण्याची शक्यता आहे.
-
MI vs KKR Live Score : ई़डन गार्डनवर पावसाने हजेरी लावली आहे
पाऊस पडत असल्याने ईडन गार्डन्सवर प्लास्टिक टाकण्यात आलं आहे. त्यामुळे टॉसला उशीर होईल.
-
MI vs KKR Live Score : मुंबईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
इम्पॅक्ट प्लेयर्स: पियुष चावला
-
MI vs KKR Live Score : कोलकात्याची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाईट रायडर्स: फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा
इम्पॅक्ट प्लेयर्स: वैभव अरोरा
-
MI vs KKR Live Score : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हेड टू हेड
कोलकाता आणि मुंबई हे संघ 33 वेळा आमनेसामने आले आहेत. मुंबईने 23, तर कोलकात्याने 10 वेळा विजय मिळवला आहे. ईडन गार्डनवर 10 सामने झाले असून यात मुंबई इंडियन्सने 7, तर कोलकात्याने 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कोलकात्याने या मैदानात एकूण 87 सामने खेळले आहेत. यात 51 सामन्यात विजय, तर 36 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. एक सामना अनिर्णित ठरला आहे.
Published On - May 11,2024 5:53 PM
