PHOTO | मैदानाबाहेरही ‘कॅप्टन कूल’ सुपरहिट, शेतीच्या यशस्वी प्रयोगानंतर महेंद्रसिंह धोनी ठरला ‘सर्वश्रेष्ठ गोपालक’

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) जलवा मैदानबाहेरही कायम आहे.

1/5
msd, mahendra singh dhoni, birsa agriculture university, Agriculture Festival, dhoni farm house,
महेंद्रसिंह धोनी, क्रिकेट विश्वातील यशस्वी कर्णधार. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने सामाजिक जीवनात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. धोनीला पशुपालन क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी आणि योगदानासाठी सर्वश्रेष्ठ गोपालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
2/5
msd, mahendra singh dhoni, birsa agriculture university, Agriculture Festival, dhoni farm house,
धोनी रांचीतील आपल्या फार्म हाऊसमध्ये 43 एकरवर भाज्यांसह फळांचंही उत्पादन घेत आहे. सोबतच तो डेयरी फार्मही चालवत आहे.
3/5
msd, mahendra singh dhoni, birsa agriculture university, Agriculture Festival, dhoni farm house,
या मेळाव्यात प्राण्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनात धोनीच्या फार्ममधील 2 गायांना आणण्यात आले होते. या दोन्ही गाया या वेगवेळ्या प्रजातीच्या होत्या.
4/5
msd, mahendra singh dhoni, birsa agriculture university, Agriculture Festival, dhoni farm house,
बिरसा कृषी विश्वविद्यालयात सुरु असलेल्या अॅग्रोटेक कृषी मेळाव्यात धोनीला सन्मानित करण्यात आलं. धोनीऐवजी हा सन्मान त्याच्या सहकाऱ्याने स्वीकारला.
5/5
msd, mahendra singh dhoni, birsa agriculture university, Agriculture Festival, dhoni farm house,
या मेळाव्यात धोनीच्या दोन्ही गायांची सर्वच बाबतीत सर्वश्रेष्ठ ठरल्या. त्यामुळे धोनीला सर्वश्रेष्ठ पशुपालकाचा सन्मान देण्यात आला. धोनीच्या फार्ममध्ये एकूण 104 गाया आहेत.