Emergency Landing : एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग, मोठं कारण आलं समोर

Emergency Landing : एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग, मोठं कारण आलं समोर

| Updated on: Jun 13, 2025 | 12:31 PM

Air India fligh : अहमदाबाद दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशीच आणखी एका विमानाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आलेलं आहे. या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर हे इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आलं आहे. थायलंडच्या स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

विमानात बॉम्ब असल्याची धमकी आली. त्यानंतर एअर इंडियाच्या एअर इंडियाच्या AI 379 या विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आलं. दरम्यान, विमानाने आज सकाळी 9:30 वाजता (0230) फुकेत विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण केले होते. परंतु अंदमान समुद्राजवळ धमकी मिळाल्याने ते परत लँड करवण्यात आले. या विमानातील 156 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमानाने अंदमान समुद्रावर चक्कर मारल्यानंतर फुकेत विमानतळावर परत लँडिंग केले. अहमदाबाद दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विमानतळ आपत्कालीन सेवेसह पुढील कार्यवाही करत आहे.

Published on: Jun 13, 2025 12:31 PM