अंग पुसायचा टॉवेल तरी मोठा…! भर कार्यक्रमात अजित पवारांनी घेतली डॉक्टरांची फिरकी
पुण्यातल्या नव्या रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक मजेशीर किस्सा घडला. रुग्णालयाच्या डॉक्टरने आपल्या आई-वडिलांचा सत्कार करण्याचा आग्रह धरला. सत्काराच्या वेळी अजित पवारांनी डॉक्टरांची छोट्याशा शालीबद्दल मजाक करत त्यांची चांगलीच फिरकी घेतली.
पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयाचं उद्घाटन केलं आहे. यावेळी एक मजेशीर किस्सा घडला. यावेळी रुग्णालयाच्या डॉक्टरने आपल्या आई-वडिलांच्या सत्काराचा आग्रह अजित पवार यांच्याकडे केला. त्यानंतर सत्कार करताना अजितदादांनी मात्र या डॉक्टरची चांगलीच फिरकी घेतली त्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, डॉक्टरांनी वडिलांना शाल टाकताना खूप काटकसर केली. छोटा टॉवेल दिला रुग्णालयाला एवढा खर्च केला आणि वडिलांना शाल देताना मात्र काटकसर केली डॉक्टर हे वागणं बरं नव्हं सगळे म्हणतात या बाबाला कार्यक्रमाला बोलवायचं म्हणजे हा बाबा काहीही बोलून जाईल पण मी खरं बोलतो आई वडिलांच्या सत्कार शालीवरून रुग्णालयाच्या उद्घाटना वेळी अजित पवारांचा डॉक्टरांना मिश्किल टोमणा. अजित पवार सत्कारवेळी म्हणाले की तुम्ही आई-वडिलांचा सत्कार करताना जे दिल त्यापेक्षा अंग पुसायचा टॉवेल तरी मोठा असतो
