अनिल परब आणि संजय राऊत यांना जेलमध्ये जावं लागणार – किरीट सोमय्या 

अनिल परब आणि संजय राऊत यांना जेलमध्ये जावं लागणार – किरीट सोमय्या 

| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 12:30 PM

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)  आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)  आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. माझा आज वाढदिवस आहे. जास्त लोकांना दुखवणार नाही. पण अनिल देशमुख, अनिल परब यांच्याबद्दल माहिती दिली आहे. संजय राऊतांबद्दल प्रविण राऊतांनी जे काही सांगितलंय त्यानंतर मी एवढंच सांगेन की अनिल देशमुख यांच्या डावी आणि उजवीकडील खोली उद्धव ठाकरेंनी सॅनिटाईज करावी. कारण संजय राऊत यांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील आणि त्यांना आत जावं लागेल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी केला आहे.