के. पी. गोसावी प्रकरणात खोल चौकशी करा, मविआचे नेते तोंडावर पडतील - Chandrakant Patil

के. पी. गोसावी प्रकरणात खोल चौकशी करा, मविआचे नेते तोंडावर पडतील – Chandrakant Patil

| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 7:41 PM

 केपी गोसावी आणि भाजपाच्या नेत्याच्या पत्नीचे खाजगी कंपनीत पार्टनर असल्याचा नवाब मलिकांनीआरोप केला होता. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंढरपूर : के पी गोसावी प्रकरणात आरोप कशाला करताय? विधानसभा कशाला पाहिजे? एक गृह मंत्री तुमचे पळून गेलेत दुसरे आहेत की त्यांच्याकडून चौकशी करा.  चौकशीनंतर असे लक्षात येईल तोंडात जे दात आहेत ते पडतील याला तोंडावर पडणे असे म्हणतात. त्यांना ज्याचे नाव घ्यायचे आहे ते त्यांनी घेतले नाही. मी कशाला घेऊ. त्यांनी खोलात जावून चौकशी करावी तोंडावर पडतील. केपी गोसावी आणि भाजपाच्या नेत्याच्या पत्नीचे खाजगी कंपनीत पार्टनर असल्याचा नवाब मलिकांनीआरोप केला होता. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.