Bombay High Court | न्यायाधीशांनी थेट सरकारवरच नाराजी व्यक्त केली! आंदोलनाच्या सुनावणीत काय सुरू?
मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनावर सुनावणी घेतली. न्यायाधीशांनी सरकारच्या बेजबाबदार वर्तनावर नाराजी व्यक्त केली.
मुंबई उच्च न्यायालयात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा क्रांती मोर्चासंबंधी सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायाधीशांनी महत्त्वाची टिप्पणी केली की, सरकारच्या वतीने पुरेसे पेट्रोलिंग नसल्यामुळे त्यांना स्वतःलाच न्यायालयात येण्यास अडचण आली. न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, जर न्यायाधीशांनाच सुरक्षा मिळत नसेल तर सामान्य नागरिकांचे काय होईल? कोर्टाने राज्य सरकारला तीन वाजेपर्यंत आझाद मैदानावरील आंदोलन कायदेशीर मार्गाने मिटवण्याचे आदेश दिले. असे न केल्यास कोर्ट स्वतःच कारवाई करेल असा इशाराही देण्यात आला. जरांगे पाटील यांच्या पुढील भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Sep 02, 2025 03:07 PM
