Operation Sindoor : तर आम्ही मुंडकं उडवू; कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा

Operation Sindoor : तर आम्ही मुंडकं उडवू; कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा

| Updated on: May 07, 2025 | 6:51 PM

पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कशाप्रकारे एअरस्ट्राईक केला, याची माहिती आज पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. त्यानंतर तयांच्या कुटुंबाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या बहिणीच्या भूमिकेवर आम्हाला गर्व असल्याचं कर्नल सोफिया कुरेशी यांच्या भावाने म्हंटलं आहे. तुम्ही डोळे वटाराल तर आम्ही मुंडकं उडवू, असं कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबाने पाकिस्तानला इशारा देत म्हंटलं आहे. आमच्या मुलीने आमच्या देशासाठी खूप मोठं काम केल्याचं सुद्धा यावेळी सोफिया कुरेशी यांचे वडील म्हणाले.

भारतीय सैन्याने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कशाप्रकारे एअरस्ट्राईक केला, याची माहिती आज पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. ही संपूर्ण रणनीती कशी आखली गेली, यावर त्यांनी पूर्ण माहिती देत ऑपरेशन सिंदूरचे फोटो आणि व्हिडीओ देखील दाखवले. यावरच आता कुरेशी यांच्या कुटुंबाने ही प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: May 07, 2025 06:51 PM