DCM Eknath Shinde : पायऱ्यांवर उभं राहून बघायचा चॅनेलचा बूम आणि ठोकायची धूम, शिंदेंची ठाकरेंवर टीका

DCM Eknath Shinde : पायऱ्यांवर उभं राहून बघायचा चॅनेलचा बूम आणि ठोकायची धूम, शिंदेंची ठाकरेंवर टीका

| Updated on: Mar 07, 2025 | 4:23 PM

Eknath Shinde Criticized Udhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत बोलताना नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या टोलेबाजीने सभागृहात एकच हशा पिकलेला बघायला मिळाला.

पायऱ्यांवर उभं राहून बघायचा चॅनेलचा बूम आणि ठोकायची धूम, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेमध्ये नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. टुरिस्ट म्हणून येतात आणि सभागृहाबाहेर आरोप करून निघून जातात, अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सत्तेच्या खुर्ची साठी 2019मध्ये कोणी काय काय सोडलं. हिंदुत्व सोडलं. वडिलांचे विचार सोडून शत्रूच्या छावणीमध्ये जाणाऱ्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान किंवा बरोबरी करणं हे योग्य होणार नाही. काहीजण टुरिस्ट म्हणून येतात आणि टुरिस्ट म्हणून जातात. सभागृहाबाहेर उभं राहून आरोप करतात आणि निघून जातात. बाहेर पायऱ्यांवर उभ राहून बघायचा चॅनेलचा बूम आणि बोलून झालं की ठोकायची धूम. कशाला पाहिजे हे सगळं?, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.

Published on: Mar 07, 2025 04:23 PM