संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका; सुनेत्रा पवारांचं मोठं आवाहन
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, गेल्या 24 तासांतील मुसळधार पावसामुळे यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज देहू येथे होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यांनी मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर देहूमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.
सततच्या पावसामुळे देहू परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलीस, महसूल विभाग, आरोग्य यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली असून, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.