Pandharpur : पंढरपुरात भाविकाला सुरक्षा रक्षकानं काळं-निळं होईपर्यंत केली मारहाण, नेमकं घडलं काय?

Pandharpur : पंढरपुरात भाविकाला सुरक्षा रक्षकानं काळं-निळं होईपर्यंत केली मारहाण, नेमकं घडलं काय?

| Updated on: Jul 07, 2025 | 12:24 PM

नागपूर येथून एक भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी आला होता. यावेळी या भाविकाच्या दंडावर आणि पाठीवर एका सुरक्षा रक्षकाने काठीने जबर मारहाण केली. भाविकाला झालेल्या मारहाणीचा भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पंढरपुरातून एक बातमी आहे. पंढरपुरात मोठ्या उत्साहात नुकतीच आषाढी एकादशी पार पडली. मात्र पंढरपुरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असललेल्या भाविकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला एका खासगी सुरक्षा रक्षकाने काठीने बेदाम मारहाण केली. गोपाळपूर रोडवरील पत्राशेड येथील दर्शन बारीतील ही घटना आहे. खासगी सुरक्षा रक्षकाने भाविकला केलेल्या बेदाम मारहाणीत भाविक रक्तबंबाळ झाला आहे.

नागपूर येथील भाविकाच्या दंडावर आणि पाठीवर या सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केल्याच्या या घटनेनंतर भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर झालेल्या या घटनेनंतर सुरक्षा रक्षकावर कारवाईची मागणी देखील होत आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे.

Published on: Jul 07, 2025 12:24 PM