नवनीत राणा यांचा कोठडीत छळ नाहीच: दिलीप वळसे पाटील

नवनीत राणा यांचा कोठडीत छळ नाहीच: दिलीप वळसे पाटील

| Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 2:20 PM

या संदर्भात मी चौकशी केली आहे. पण वस्तुस्थिती तशी दिसत नाही. कुणाचं काही म्हणणं असलं तरी पोलीस कायद्यानेच निर्णय घेतात. कारवाई करतात, असंही वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं. दिलीप वळसे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांना कोणत्याही प्रकारची हीन वागणूक दिली नाही. त्यांचा कोठडीत कोणत्याही प्रकारचा छळ झाला नाही, असं सांगतानाच राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिलं आहे. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी फॅक्च्युअल रिपोर्ट मागितला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. लोकसभा अध्यक्षांना (lok sabha speaker) याबाबतचा रिपोर्ट पाठवला जाईल, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी सांगितलं.

Published on: Apr 26, 2022 02:20 PM