कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची नाबार्डकडून तपासणी; काय कारण?
Kolhapur District Central Bank : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची नाबार्डकडून तीन दिवस तपासणी. नेमकं काय कारण?
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची नाबार्डकडून तपासणी झाल्याची माहिती आहे. तीन दिवस ही तपासणी झाली आहे. नियमित तपासणी असल्याचा दावा जिल्हा बँकेने केला आहे. मात्र ईडीने आक्षेप घेतलेल्या मुद्द्यांसंबधी चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ब्रिक्स आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यांना दिलेल्या कर्जाबाबत ईडीने चौकशी केली होती. ईडीच्या चौकशीत कर्जाबाबत आक्षेप घेण्यात आला होता. मात्र नाबार्ड आणि रिझर्व बँकेकडून झालेल्या तपासणीत कोणताही आक्षेप नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर नाबार्ड करून पुन्हा एकदा तपासणी झाल्याची माहिती आहे.
Published on: Apr 27, 2023 08:44 AM
