MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 20 July 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 20 July 2021

| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 8:36 AM

आषाढी एकादशीनिमित्त महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71 वर्ष) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60 वर्ष) यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते 20 वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंढरपुरात पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. यावेळी वर्धा जिल्ह्यातील कोलते दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली.

आषाढी एकादशीनिमित्त महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71 वर्ष) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60 वर्ष) यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते 20 वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत.

दीर्घ कालीन सेवेचे फळ महापूजेच्या निमित्ताने मिळाल्याच्या भावना कोलते दाम्पत्याने व्यक्त केल्या. महापूजेचा मान मिळाला, हे कष्टाचं फळ आहे. 2000 मध्ये कोलते पंढरपूरला आले. मात्र 1972 पासून ते वारी करत आहेत. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावा, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी यावेळी सांगितलं.

Published on: Jul 20, 2021 08:36 AM