Maharashtra 12th Result 2025 : बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?

Maharashtra 12th Result 2025 : बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?

| Updated on: May 05, 2025 | 12:13 PM

राज्यात यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९४.५८ टक्के इतका लागला आहे. तर मुलांचा निकाल ८९.५१ टक्के इतका लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर कऱण्यात आला आहे. हा निकाल समोर आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींचाच स्वॅग दिसून आला. अर्थात यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. तर राज्यातील एकूण नऊ विभागांपैकी बारावीच्या निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल ठरलं असून कोकणाने बाजी मारली आहे. निकालाची सरासरी नेहमीप्रमाणे आहे, अशी माहिती महाराष्ट्र बोर्डाने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन दिली. कोकणचा निकाल हा ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला असून लातूर विभागाचा सर्वात कमी ८९.४६ टक्के निकाल लागला आहे. तर राज्यात यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे.

असा आहे विभागनिहाय निकाल

कोकण -९६.७४
कोल्हापूर – ९३.६४
मुंबई – ९२.९३
संभाजीनगर – ९२.२४
अमरावती – ९१.४३
पुणे -९१.३२
नाशिक -९१.३१
नागपूर – ९०.५२
लातूर – ८९.४६

Published on: May 05, 2025 11:53 AM