राड्यानंतर मविआचे नेते राज्यपालांच्या भेटीला; आत्ताच्या घडीच्या दोन मोठ्या बातम्या

राड्यानंतर मविआचे नेते राज्यपालांच्या भेटीला; आत्ताच्या घडीच्या दोन मोठ्या बातम्या

| Updated on: Jul 18, 2025 | 12:41 PM

एकीकडे राड्यानंतर मविआचे नेते राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. तर दुसरीकडे अक्कलकोटमध्ये मराठा संघटनांनी बंद पुकारला आहे.

महाविकास आघाडीच शिष्ट मंडळ सध्या राज्यपालांच्या भेटीसाठी गेलं आहे. काल विधान भवनाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर राजेत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी या मागणीसाठी महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. तर दुसरीकडे सोलापूरच्या अक्कलकोट येथे मराठा संघटनांकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हल्ला झाला होता. त्य हल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येत आहे. आज दुपारी 2 वाजेपर्यंत अक्कलकोट बंदची हाक देण्यात आलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोर्चा देखील काढण्यात आला आहे. जय चौकात हल्ला झाला होता. त्याच ठिकाणी या मोर्चाचा समारोप होणार असून मोर्चाचे रूपांतर सभेत होणार असून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला जाणार आहे.

Published on: Jul 18, 2025 12:41 PM