Manoj Jarange Patil : गुंडांचा माज उतरवणार, बोलणार कमी काम जास्त करणार – मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil : गुंडांचा माज उतरवणार, बोलणार कमी काम जास्त करणार – मनोज जरांगे पाटील

| Updated on: May 18, 2025 | 6:15 PM

Shivraj Divte assault case : आज मनोज जरांगे यांनी रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटेची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

किती दिवस आम्ही तरी शांत रहायचे? ही वाढती गुंडगिरी रोखण्यासाठी मीच पुढाकार घेणार आहे, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. परळीतील शिवराज दिवटे याला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. आज मनोज जरांगे यांनी रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटेची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. बीड जिल्ह्यात गुंडगिरीच्या माध्यमातून हल्ले होतच राहणार, आम्ही काय नुसतं भेटी देत फिरायचं? ही विदारक परिस्थिती दूर करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईल असंही यावेळी जरांगे यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सामूहिक कट रचून शिवराजला जीवे मारण्यासाठीच अपहरण करण्यात आलं होतं. मात्र लोक धावून आल्याने त्याचा जीव वाचला. त्याच्या अंगावरील मारहाणीचे वळ पाहून अंगावर काटा येतो. अशा घटना वारंवार घडूनही सरकार काहीच करत नाही. किती दिवस आम्ही तरी शांत रहायचं? बीड जिल्ह्यातील सर्व घराणे व सामाजिक क्षेत्रातील लोकांशी चर्चा करुन पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. गुंडांचा माज उतरवणार. यापुढे बोलणार कमी व काम जास्त करणार, असा सूचक इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Published on: May 18, 2025 06:14 PM