Iran America War | युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले..
आखाती देशातील युद्धाला आता दोन आठवड्यांसाठी विराम लागणार आहे. अमेरिका, इराण दोन्ही देशांनी कराराला सहमती दर्शवली आहे. यावेळी भारताचे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी युद्धाबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि मत मांडले.
आखाती देशातील युद्धाला आता दोन आठवड्यांसाठी विराम लागणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. इराणनेही या कराराला सहमती दर्शवली आहे. यावेळी भारताचे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी युद्धाबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि मत मांडले.
गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. यावेळी ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले, ‘या देशांमधील युद्धजन्य परिस्थितीत जगभराला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता हे युद्ध थांबणार आहे ही मोठी बाब असून जर शांततेच्या दृष्टीने प्रयत्नशील चर्चा झाली तर युद्ध कायमचंही थांबण्याची शक्यता आहे.’ पुढे ते म्हणाले युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इराण इस्त्रायलचे हल्ले होत आहेत तो संबंधित भूभागाचा नेहमीचा मुद्दा राहिला आहे. मात्र जर युद्ध शांत झालं तर नक्कीच याचा भारतावर तसेच विश्वस्तरावर चांगला परिणाम होईल.’
