मराठा आरक्षणावर छगन भुजबळ यांची कडक प्रतिक्रिया; म्हणाले, …तर कोर्टात जाऊ

| Updated on: Jan 27, 2024 | 12:00 PM

सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात ठिकणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिसली आहे.

Follow us on

Maratha protest mumbai: मराठा समाजाचा विजय झाला असं मला वाटतय, परंतू मला काय तस काय वाटत नाही. झुंडशाहीने अशा प्रकारचे कायदे आणि नियम बदलता येत नाही. आम्ही सुद्धा शपथ घेताना न घाबरता आम्ही निर्णय घेऊ अशी शपथ आम्ही सर्व मंत्रीमंडळानी घेतली आहे. आता ही एक सूचना असून याच रुपांतर नंतर होणार. 16 फेब्रुवारी पर्यंत याच्यावर हरकती मागवल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजाचे वकील असतील यांनी अभ्यास करून या हरकती पाठविण्याचे काम करावं. ओबीसीच्या सर्व कार्यकत्यांनी देखील अशा हरकती पाठवा.

सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात ठिकणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिसली आहे. ओबीसीमध्ये तुम्हाला आरक्षण मिळालं आहे असं मराठा समाजाला वाटतंय मात्र पण तुम्ही दुसरी बाजू लक्षात घ्या. 50 टक्क्यांमधील संधी मराठा समाजाने गमवली आहे. 17 टक्क्यांत 80-85% ओबीसी येतील. जात ही जन्माने येते. ते एखाद्याच्या पत्राने येत नसते.

जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य

  • ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला लागू केल्या जाणार तसेच 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र मिळणार.
  • मराठवाड्यात नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ दिली जाणार.
  • वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार.
  • अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार.