Udyanraje Bhosale | खोकला आला तरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येते, उदयनराजेंची प्रतिक्रिया

Udyanraje Bhosale | खोकला आला तरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येते, उदयनराजेंची प्रतिक्रिया

| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 6:29 PM

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते, असं अजब विधान उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (mp udayanraje bhosale statement on coronavirus)

आपल्या बिनधास्त आणि बेधडक विधानांमुळे प्रसिद्ध असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी आता अजब विधान केलं आहे. खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते, असं अजब विधान उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरोना विषयी पुन्हा एकदा एक अजब वक्तव्य केल आहे. खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज साताऱ्यात माध्यमांना दिली. आपल्याला कोराना होता का नाही हे माहीत नाही पण ताप असताना सुद्धा मी गार पाणी प्यायचो. त्यामुळे माझा खोकला वाढला आणि कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोणी काळजी करू नका. मला कोरोना झाला तेव्हा किती लोकांनी देव पाण्यात ठेवले मला माहीत नाही. पण, आज मी तुमच्यासमोर उभा आहे, असा मिश्किल टोला उदयनराजे यांनी लगावला.