यंत्रणेचा गैरवापर सुरु, नवाब मलिक सतत विरोधात बोलत असल्यानं ED ची कारवाई

यंत्रणेचा गैरवापर सुरु, नवाब मलिक सतत विरोधात बोलत असल्यानं ED ची कारवाई

| Updated on: Feb 23, 2022 | 10:57 AM

यात काही नवीव नाही, असं शरद पवार म्हणालेत. कुठलं तरी प्रकरण काढून मलिकांना अडकवलं जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती, की आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होती.

मुंबई : नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरी पहाटे जाऊन ईडीनं (Enforcement Directorate) जी कारवाई केली, त्यावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणी कोणतंही आश्चर्य वाटलं नसल्याचं शरद पवार (Sharad Pawar on Nawab Malik’s ED inquiry) यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावर पत्रकारांनी विचारलं असता,  यात काही नवीव नाही, असं शरद पवार म्हणालेत. कुठलं तरी प्रकरण काढून मलिकांना अडकवलं जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती, की आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होती. त्यामुळे याबद्दल अधिक भाष्य करायची गरज नाही, असं शरद पवार म्हणालेत.

 

 

Published on: Feb 23, 2022 10:57 AM