Sharad Pawar : …म्हणून मी वसंतदादांचं सरकार पाडलं, शरद पवारांची जाहीर कबुली अन् सांगितला ‘तो’ किस्सा, 1978 च्या बंडाची आजही चर्चा

Sharad Pawar : …म्हणून मी वसंतदादांचं सरकार पाडलं, शरद पवारांची जाहीर कबुली अन् सांगितला ‘तो’ किस्सा, 1978 च्या बंडाची आजही चर्चा

| Updated on: Aug 18, 2025 | 3:09 PM

वसंतदादांचं सरकार मीच पाडलं असं वक्तव्य शरद पवारांनी एका कार्यक्रमातून केलं. वसंतदादाचे सरकार मी पाडल्यानंतर त्यांनीच भूतकाळ विसरून मला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिल्याचं ही यावेळी पवारांनी सांगितलं यातून आताच राजकीय वातावरण आणि राजकीय नेते त्यासह आधीच्या नेत्यांमधला फरक दाखवण्याचा प्रयत्न पवारांनी केलाय

१९७८ मधील राजकीय बंडाची चर्चा नेहमी राज्यात होतेच त्यानंतर राज्यात अनेकदा बंडाळी झाली पण शरद पवारांचं बंड कायम चर्चेत असतं. वसंतदादा हे आमच्या लोकांचे नेते पण ते इंदिरा काँग्रेस मध्ये होते आणि आमच्या तरुणांचा काँग्रेसला विरोध होता. त्यामुळेच आम्ही वसंतदादांचं सरकार घालवलं, अशी जाहीर कबुली शरद पवारांनी दिली. वसंतदादांचं सरकार मी पाडल्यानंतर त्यांनीच भूतकाळ विसरून गांधी आणि नेहरूंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला, असंही शरद पवारांनी म्हटलंय. १९७८ मधील राजकारण कसं होत आणि आताच राजकारण कसं बदलत गेलं याचा संदर्भ पवारांनी या वेळेला दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 18, 2025 03:09 PM