NCP Andolan: पुण्यात महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आक्रमक; स्मृती इराणी थांबलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन

NCP Andolan: पुण्यात महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आक्रमक; स्मृती इराणी थांबलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन

| Updated on: May 16, 2022 | 6:27 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी इराणी थांबलेल्या हॉटेलबाहेर आक्रमक आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला.

पुणे – इंधन , घरगुती गॅसच्या दरातील वाढ आणि महागाईच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक होत पुण्यात आंदोलन करण्यात आले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani)आज पुणे दौऱ्यावर आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी इराणी थांबलेल्या हॉटेलबाहेर आक्रमक आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी(Police) या कार्यकर्त्यांना वेळीच रोखत त्यांना हॉटेल परिसरातून बाहेर काढलं. यावेळी केंद्र सरकार आणि स्मृती इराणी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यापूर्वी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महागाईच्या विरोधात आंदोलन केले.

Published on: May 16, 2022 06:27 PM