Nishikant Dubey : निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..

Nishikant Dubey : निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..

| Updated on: Jul 19, 2025 | 2:14 PM

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवचलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांना आव्हान दिले होते. दुबे म्हणाले, प्रत्येकाच्या घरात सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू किंवा उत्तर प्रदेशात या, आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. महाराष्ट्राबाहेर पाऊल टाका, मग तुम्हाला धडा शिकवू, असं आव्हान त्यांनी दिलं होतं.

या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी निशिकांत दुबे यांना खणखणीत उत्तर दिले. ते म्हणाले, दुबे, तुम्ही मुंबईत या… मुंबईच्या समुद्रात तुम्हाला डुबे डुबे करून मारू. यानंतर निशिकांत दुबे यांनी पुन्हा एक्सवर पोस्ट करत ठाकरेंना डिवचले. ते म्हणाले, मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली का? या शाब्दिक चकमकीमुळे मराठीच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले आहे.

Published on: Jul 19, 2025 02:14 PM