Operation Sindoor : 26/11 च्या मुंबई हल्ल्यातल्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे भारतानं उडवले, ‘या’ 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक
भारताने पाकिस्तानसह पीओकेत जोरदार हल्ला केल्याची मोठी बातमी समोर येत आहे. मधरात्री एक ते दीडच्या दरम्यान नऊ ठिकाणी भारताने दहशतवादी तळांवर हा हवाई हल्ला केला.
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर जबरदस्त एअर स्ट्राईक केला आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानातील 9 ठिकाणी हल्ला केला असून या हल्ल्यात 50 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले. विशेष म्हणजे लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर भारताकडून यशस्वी हवाई हवाई हल्ला करण्यात आलाय. मुंबईत झालेल्या 26\11 च्या दहशतवाद्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं होतं तोच अड्डा भारताकडून टार्गेट करण्यात आला. हल्ल्यावेळी भारताकडून चार मिसाईल डागण्यात आले. या एअर स्ट्राईकमुळे येथील 25 ते 30 दहशतवादी ठार झालेत. दरम्यान, भारताने पाकिस्तानातील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, बिंबर आणि सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर अशा 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केल्याचे पाहायला मिळाले.
