Indian Army : गोल्डन टेम्पलवर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; भारतीय लष्कराने डाव हाणून पडला

Indian Army : गोल्डन टेम्पलवर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; भारतीय लष्कराने डाव हाणून पडला

| Updated on: May 19, 2025 | 12:51 PM

Indian Army Operation Sindoor : पाकिस्तानच्या सैन्याकडून भारतातल्या सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे.

पंजाबमधील अमृतसर येथे असलेल्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे. 8 आणि 9 मे रोजी घुसखोरी करून सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट होता.

पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताकडून कठोर पावलं उचलण्यात आलेली आहेत. यातच ऑपरेशन सिंदूर राबवून भारताकडून पाकिस्तानातल्या 9 अतिरेकी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या ऑपरेशन  सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी भारताच्या 15 मुख्य शहरांना पाकने टार्गेट केलेलं होतं. यातच अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर देखील हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला असल्याचं सैन्याकडून सांगण्यात आलेलं आहे. हा हवाई हल्ला होता. मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा हल्ला करण्याचा प्रयत्न उधळून लावला. याबद्दल सीमेवरील जवानांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे.

Published on: May 19, 2025 12:51 PM