Prakash Mahajan : मनसेमध्ये नाराजीनाट्य? तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत
MNS Dispute : मनसेमध्ये दिवाळी पण माझ्या घरी अंधार असल्याचं म्हणत प्रकाश महाजन यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.
नारायण राणे प्रकरणात पक्षाने मला साथ दिली नाही. माझी भक्ती खरी असली तर पांडुरंग मला बोलवेल, असं देखील मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हंटलं आहे. मनसेमध्ये दिवाळी पण माझ्या घरी अंधार असल्याचं देखील महाजन यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, नारायण राणे प्रकरणात पक्षाने माझी साथ दिली नाही, मलाच फाशी, पण मी विसरलो. प्रवक्ते बोलत आहेत, पण फक्त माझ्यासाठी अटी होत्या का? पण मी देव बदलणार नाही, पण देवाने बोलविल्या शिवाय जाणार नाही. माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवेल. मला मान नाही, आता मी प्रवक्ता नाही. राणेंना अंगावर घेतलं, त्याचं हे फळ मिळत आहे. मी आता घरी बसणार आहे. यातना होत आहे, चार दिवस झोपलो नाही. राणेंना भिडलो तेव्हा पक्षाचं कुणीच सोबत नव्हतं. डोळ्यात पाणी आलं, का जिवंत राहिलो असं वाटत आहे. जनतेसमोर कोणत्या तोंडाने जावे, घरातच आमची किंमत नाही. इतर वेळी प्रवक्ता म्हणून जीव तोडून पक्षाची बाजू मांडतो, मात्र त्याला तुम्ही बोलवत नाही. पक्षात दिवाळी आहे, पण माझ्या घरात अंधार आहे, अशी खंत देखील शिबिराला न बोलवल्याने महाजन यांनी व्यक्त केली.
