राज्यात सत्तांतराचे संकेत देणाऱ्या अंजली दमानिया यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणतात….

राज्यात सत्तांतराचे संकेत देणाऱ्या अंजली दमानिया यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणतात….

| Edited By: | Updated on: Apr 12, 2023 | 3:13 PM

Supriya Sule : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांशी चर्चा केली नाही, हे वक्तव्य शरद पवारांनी काहीतरी विचार करूनच दिलं असेल. ते असंच कोणतंही वक्तव्य करत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

पुणे : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.15 आमदार हे लवकरच बाद होतील आणि ते बाद झाल्यावर अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जाणार असा प्लॅन आहे. मंत्रालयातील माझ्या परिचयाच्या वक्तीने मला हे सांगितलं आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वतुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांनी काय ट्विट केलं हे मला माहिती नाही. पण प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तसं त्यांनी ते मांडलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Published on: Apr 12, 2023 03:11 PM