Raj Thackeray Mira Bhayandar Sabha LIVE: त्या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का पेटला आहे? राज ठाकरेंचा फडणवीसांवर थेट घणाघात
Raj Thackeray Sabha LIVE : राज ठाकरे यांनी आज मीरा भाईंदर येथील सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, मराठीसाठी मराठी सक्तीची. इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात. कोणाच्या दबावाखाली? कोण दबाव टाकतं तुमच्यावर? केंद्राचं हे पूर्वीपासूनचं आहे. काँग्रेस असल्यापासूनचं हे सगळं, अशी विखारी टीका राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. मीरा भाईंदर येथे आज झालेल्या सभेत राज ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलत होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. त्याचा प्रचंड मोठा लढा झाला. मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता. काही गुजराती व्यापारी आणि नेत्यांचा होता. अत्रेंचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये हे पहिलं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं. वल्लभभाई पटेलांनी. त्यांना लोहपुरुष म्हणून मानत आलो. देशाचे गृहमंत्री. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केला. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात आंदोलन झाली. तेव्हा मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून मराठी माणसाला ठार मारलं. अनेक वर्षापासून त्यांचा मुंबईवर डोळा आहे. सहज होत नाही. हे चाचपडून पाहत आहे. हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र विरोध करतो का. मराठी माणूस पेटतोय का. तो शांत दिसला तर हिंदी भाषा आणणं ही त्यांची पायरी असेल. हळूहळू मुंबई ताब्यात घ्यायची आणि गुजरातला द्यायची ही त्यांची स्वप्न आहेत.
