Raj Thackeray Sabha Speech : तर दुकानं नाही, शाळाही बंद करेन..; ‘राज’ गर्जनेतून मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

Raj Thackeray Sabha Speech : तर दुकानं नाही, शाळाही बंद करेन..; ‘राज’ गर्जनेतून मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

| Updated on: Jul 18, 2025 | 9:38 PM

Raj Thackeray Sabha : राज ठाकरे यांनी आज आपल्या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून इशारा दिला आहे.

फडणवीस जी, तिसरी भाषा सक्तीची आणणार म्हणजे आणणार. तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करेन, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आज राज ठाकरेंनी सरकारवर तोफ डागली.

राज ठाकरे यांनी म्हंटलं की, मराठी शिका, आम्हाला तुमच्याशी वावडं नाही तुमच्याशी. भांडण नाहीये. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार. खरं तर काय विषय होता. पहिली ते पाचवी राज्य सरकारने म्हणे हिंदी कंपल्सरी. म्हणे हिंदी भाषा शिकली पाहिजे. त्यावरून हे सर्व सुरू झालं. काल आमचे मुख्यमंत्री फडणवीस, त्यांनी काल सांगितलं म्हणे, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता. हे काय राजकारण सुरू आहे हे लक्षात घ्या. कोणती हिंदी घेऊन बसलो. त्याला फक्त २०० वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावर मोदींना मी सांगितलं माझ्या पाच गोष्टी आहे. उत्तर प्रदेश बिहारमध्ये हिंदी बोलली जाते,मग नोकरी धंद्यासाठी हे लोक महाराष्ट्रात का येतात. तुमच्याच भाषेने तुमचं भलं झालं नसेल तुम्हाला दुसऱ्या प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या लागत असेल, गुजरातमध्ये जाऊन मार खावा लागत असेल तर हिंदीने तुमचं काय भलं केलं? कोणती भाषा घेऊन बसलो आपण. त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटला? मला कारणच नाही कळलं. हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या. ज्याच्या कानफटात मारली त्याला विचारा त्याची मातृभाषा कोणती.

Published on: Jul 18, 2025 09:38 PM