Walmik Karad : धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप

Walmik Karad : धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप

| Updated on: Apr 15, 2025 | 1:15 PM

Ranjit Kasale On Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर संदर्भात निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनाच वाल्मिक कराड नको होते, असंही कासले यांनी म्हंटलं आहे. हे आरोप करणारा आणखी एक व्हिडिओ कासले यांनी बनवून शेअर केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्यासाठी आपल्याला सुपारी मिळाली होती. त्यासाठी 5 ते 50 कोटी रुपयांची ऑफर देखील होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी यापूर्वी केला होता. त्यानंतर आता कासले यांनी आणखी एक व्हिडिओ बनवून धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी प्रयत्न केला असल्याचं म्हंटलं आहे. धनंजय मुंडे यांचे काही प्रकरण वाल्मिक कराड बाहेर काढणार होते, त्यामुळे धनंजय मुंडेंना कराड नको होते.

Published on: Apr 15, 2025 01:15 PM