Mumbai Ray Road : मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
Mumbai Ray Road Opens for Vehicles : मुंबईतील वाहतुकीला दिलासा देणारा हार्बर लाइनवरचा रे रोड केबल स्टे उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.
मुंबईतील वाहतुकीला दिलासा देणारा हार्बर लाइनवरचा रे रोड केबल स्टे उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पूलाचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर आज सर्वसामान्य नागरिकांसाठी हा पूल खुला करण्यात आलेला आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच या रोडवर वाहनांची आणि नागरिकांची गर्दी बघायला मिळत आहे. रे रोडवर उभारण्यात आलेल्या या पूलाची लेंथ 6 असून केबल स्ट्रेट ब्रिजच्या आधारावर हा पूल आहे. फेब्रीवारी 2022मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली होती. २६६ कोटी रुपये खर्चून 385 मीटर लांबीच्या या पूलाचं काम करण्यात आलेलं आहे. या उड्डाण पूलामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. ब्रिटीश बनावटीच्या पुलाची पुनर्बांधणी करून भायखळा व माजगाव यांना या पूलाची जोडणी करण्यात आलेली आहे. जागतिक दर्जाचे डिझाइन आणि संकल्पनेवर आधारित रोषणाई देखील करण्यात आलेली आहे.
