Sanjay Raut : शिंदे – शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut : शिंदे – शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट

| Updated on: Apr 15, 2025 | 12:29 PM

Sanjay Raut On Shinde - Shah Meeting : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार हे निधी देत नसल्याची तक्रार अमित शाह यांच्याकडे केली असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

अजित पवार हे आमच्या फायली मंजूर करत नाहीत, आम्हाला निधी देत नाहीत, अशी तक्रार एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केली असल्याचं खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटलं आहे. याचा अर्थ त्यांच्यासोबत असणारे 5-25 गद्दार आमदार हे केवळ निधीसाठी त्यांच्यासोबत राहिलेत हे स्पष्ट होते, असंही राऊत यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या बैठकीबद्दल बोलताना त्यांनी हे भाष्य केलं.

पुढे राऊत म्हणाले की, त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी हवी आहे का? अमित शहांनी यावर एकनाथ शिंदे यांना काय उत्तर दिले? ते माझ्याकडे आहे. हे उत्तर लोकांपुढे आले तर या राज्याचे चित्र स्पष्ट होईल. आम्हालाच निधी मिळत नाही असा धोशा शिंदेंनी लावला तेव्हा अमित शहा यांनी त्यांना दिलेले उत्तर फार महत्त्वाचं असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. यावेळी पत्रकारांनी अमित शहा एकनाथ शिंदेना नेमकं काय म्हणाले? ही माहिती तुम्हाला कुणी दिली? असा प्रश्न केला तेव्हा राऊतांनी माझं नाव संजय राऊत असल्याचं स्पष्ट केलं. माझं नाव संजय राऊत आहे. महाभारतातला संजय सर्व चित्र डोळ्यांत व कानात साठवून सांगत होता. आमचे सुद्धा तिकडे लोक आहेत. हे लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे उत्तर फार इंटरेस्टिंग असल्याचं राऊत यावेळी म्हणाले.

Published on: Apr 15, 2025 12:29 PM