Sharad Pawar : म्हणून राऊतांना जेलमध्ये जावं लागलं; शरद पवारांनी सांगितलं राऊतांच्या जेलमध्ये जाण्याचं कारण

Sharad Pawar : म्हणून राऊतांना जेलमध्ये जावं लागलं; शरद पवारांनी सांगितलं राऊतांच्या जेलमध्ये जाण्याचं कारण

| Updated on: May 18, 2025 | 10:53 AM

Narkatla Swarg Book Publication : संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल मुंबईत पार पडला. यावेळी शरद पवार यांनी या पुस्तकावर भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी 58 कोटीच्या प्रकरणाची माहिती देशाच्या प्रमुख लोकांना दिली. कारवाई झाली तर नाहीच, पण राऊत जेलमध्ये गेले, असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे. संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी शनिवारी शरद पवार बोलत होते. या पुस्तकातून संजय राऊत यांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, जवळपास 30-35 लोक, कंपन्या अशा होत्या की ज्यांच्याकडून पैसे काढले गेले. टी रक्कम 58 कोटीच्या आसपास होती. ही माहिती संजय राऊत यांनी देशाच्या प्रमुख लोकाना लिखित स्वरूपात दिली. त्याचा परिणाम म्हणून कारवाई न होता राऊत यांनाच जेलमध्ये जावं लागलं. राऊत यांची लेखनी काही लोकांना पचत नव्हती. ते अस्वस्थ होते. संधीची वाट बघत होते. ती संधी त्यांना पत्राचाळ प्रकरणाने मिळाली, असंही शरद पवार यांनी म्हंटलं आहे.

Published on: May 18, 2025 10:44 AM