Shivsena Politics : बापावरून ठाकरे – शिंदे पेटले; वार पलटवार सुरू

Shivsena Politics : बापावरून ठाकरे – शिंदे पेटले; वार पलटवार सुरू

| Updated on: Apr 18, 2025 | 8:27 AM

शिंदेंच्या शिवसेनेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आता बापावरून राजकारण पेटलं आहे. बाप चोरल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील आता त्यावर प्रत्युत्तराच्या फैरी झाडल्या आहेत.

ठाकरे आणि शिंदे गटात आता बापावरून वाद सुरू झाला आहे. जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार ? आम्ही तुमचा बाप चोरला नाही, तर हृदयात ठेवला, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला आहे. तर शिंदेंनी बाळासाहेबांचा कॉंग्रेस संदर्भातला जुन्या व्यक्तव्याचा व्हिडिओ देखील यावेळी दाखवला आहे. उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या शिबिरात बोलताना मला कोणाचा बाप चोरण्याची गरज नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर शिंदेंनी देखील यावर प्रत्युत्तर देत पालटवर केला आहे.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, बाप चोरला, बाप चोरला असं रडगाण काल सुरू होतं. आम्ही बाप चोरला नाही. तो कायम हृदयात पूजला. यापुढेही पूजत राहू. पण तुम्ही पाप झाकण्यासाठी त्यांचा आवाज चोरला,’ असं म्हणत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जून व्हिडीओ दाखवला आहे. त्यामुळे आता दोन्ही शिवसेनेत बापावरून राजकारण पेटलेलं बघायला मिळत आहे.

Published on: Apr 18, 2025 08:27 AM