Special Report | ओबीसी आरक्षणाबाबतचा इम्पिरिकल डेटाचा प्रश्न निकाली निघणार?

| Updated on: Sep 03, 2021 | 9:48 PM

राज्य मागासवर्ग आयोगाला इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे आदेश देण्यावर, तसंच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको, या मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. तर ओबीसींचा डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात गेलो असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.

Follow us on

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली. महत्वाची बाब म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाला इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे आदेश देण्यावर, तसंच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको, या मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. तर ओबीसींचा डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात गेलो असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.