Sudhir Mungantiwar : जसे संस्कार तसे उच्चार; खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
Sudhir Mungantiwar on Raj Thackeray : राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यावर आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात वेडं वाकडं वागायचा प्रयत्न केला तर गाल आणि हाताची युती होईल, अशी खळ्ळखट्याकची भाषा काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरच्या सभेतून केली आहे. त्यावर आता सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे. जसे संस्कार तसे उच्चार अशी टीका मुनगंटीवारांनी राज ठाकरेंवर केली आहे.
सरकार या गोष्टी लादणार असेल तर या लोकांची हिंमत वाढणारच आहे. तुमची सत्ता लोकसभेत आणि विधानभवनात. आमची सत्ता रस्त्यावर आहे. काही नाही. ५६ इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा. हा महाराष्ट्र आहे. तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. परत कोणी वेडावाकडा वागण्याचा प्रयत्न केला तर त्याचा गाल आणि हात या सर्व गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही, असा थेट खळ्ळखट्याकचा इशारा काल राज ठाकरेंनी सभेतून दिला आहे. त्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांनी त्यावर टीका केली आहे. त्यांनी काय भाषा वापरायची हा त्या पक्षाच्या संस्काराचा भाग आहे. जरे संस्कार, तसे उच्चार, असा टोला त्यांनी लगावला आहे.
