VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 7 April 2022
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या प्रचंड अडचणीत आले आहेत. सोमय्या यांनी आज जरंडेश्वर साखर कारखान्याप्रश्नी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या प्रचंड अडचणीत आले आहेत. सोमय्या यांनी आज जरंडेश्वर साखर कारखान्याप्रश्नी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यापूर्वी सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधला. जरंडेश्वरबाबत सर्व माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राऊतांच्या आरोपांवर विचारलं. आयएनएस विक्रांतचे पैसे कुठे गेले? असा सवाल पत्रकारांनी विचारताच सोमय्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. सोमय्या तडक खुर्चीतून उठले आणि जायला निघाले. मात्र, पत्रकारांनी त्यांचा पिच्छा पुरवला.
