Uddhav Thackerya: घालीन लोटांगण, वंदीन चरण हाच..; उद्धव ठाकरे मुलाखतीत काय म्हणाले? पाहा VIDEO

Uddhav Thackerya: घालीन लोटांगण, वंदीन चरण हाच..; उद्धव ठाकरे मुलाखतीत काय म्हणाले? पाहा VIDEO

| Updated on: Jul 19, 2025 | 10:45 AM

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना भाजपमध्ये विलीन करायला निघाले आहेत, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. तर घालीन लोटांगण, वंदीन चरण हाच शिंदेंसमोरचा शेवटचा पर्याय असल्याचं उद्धव ठाकरेंनी त्यावर उत्तर देत म्हंटलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करत शिंदेंवर टीका केली आहे.

यावेळी ज्यांनी माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं असा भ्रम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि त्यांच्या दिल्लीतल्या मालकांच्या माध्यमातून निर्माण केला. ते स्वत:ची डुप्लीकेट शिवसेना भाजपमध्ये विलीन करायला निघालेले आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांच्याकडे दूसरा पर्याय काय आहे? त्यांच्या गुरुपौर्णिमेचं वर्णन तुम्ही केलं आणि त्याचं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. त्यामुळे असे लोक परावलंबीच असतात. त्यांना शिवसेनेचं अस्तित्व संपवायच आहे, पण ते संपवू शकत नाही. इतके वर्ष होऊनही जनतेला ते माझ्यापासून तोडू शकले नाही. हेच त्यांच दु:ख आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय हा घालीन लोटांगण, वंदीन चरण हाच आहे, अशी तिखट टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Published on: Jul 19, 2025 10:45 AM