‘जीव जळतो असं पाहून पण…’, स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ

‘जीव जळतो असं पाहून पण…’, स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ

| Updated on: Feb 27, 2025 | 4:51 PM

पुण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी स्वारगेट बस स्टँड परिसरामधील सुरक्षारक्षक कार्यालयाची तोडफोड करत आंदोलन केलं. यावेळी वसंत मोरे यांनी पर्दाफाश करत ज्या स्वारगेटच्या एसटी बस परिसरामध्ये तरुणीवर बलात्काराची घटना घडली त्याच बस डेपोमध्ये जुन्या चार शिवशाही बसेसचं लॉजिंग करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला

पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारात एसटीच्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आले. बलात्काराची संतापजनक घटना घडल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी स्वारगेट बस स्टँड परिसरामधील सुरक्षारक्षक कार्यालयाची तोडफोड करत आंदोलन केलं. यावेळी वसंत मोरे यांनी पर्दाफाश करत ज्या स्वारगेटच्या एसटी बस परिसरामध्ये तरुणीवर बलात्काराची घटना घडली त्याच बस डेपोमध्ये जुन्या चार शिवशाही बसेसचं लॉजिंग करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला यानंतर वसंत मोरेंनी पूर्णपणे बस स्थानकाची पाहणी केली. दरम्यान, स्वारगेटमध्ये तरूणीवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेनतंर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं होतं. वसंत मोरे यांनी आंदोलन केल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांचं कौतुक करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरा चालेल… असं उद्धव ठाकरेंनी फोनवरून वसंत मोरे यांना सांगितलं आहे. ‘चांगलं काम केलं… असेच जागते रहा… जे काही सुरू आहे… त्याने जीव जळतो. महाराष्ट्र कुठे चाललाय? मराठी भाषेवर आक्रमण… पण चांगलं काम केलं.. ‘, असंही म्हणत ठाकरेंनी यावेळी वसंत मोरेंचं कौतुक केलं.

Published on: Feb 27, 2025 04:49 PM