Udhav Thackeray : ‘तुम्ही मर्सिडीजची किंमत वाढवली नाही?’; विधानभवनाच्या गॅलरीतली ‘ती’ भेट अन् मिश्किल टोलेबाजी

Udhav Thackeray : ‘तुम्ही मर्सिडीजची किंमत वाढवली नाही?’; विधानभवनाच्या गॅलरीतली ‘ती’ भेट अन् मिश्किल टोलेबाजी

| Updated on: Mar 10, 2025 | 5:13 PM

Thackeray, Fadnavis, Pawar Meeting : विधानभवनाच्या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मिश्किल टोले लगावलेले बघायला मिळाले.

विधानभवनाच्या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट झाली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ही भेट झाल्याने या तिघांमध्ये मिश्किल टोलेबाजी झालेली बघायला मिळाली. काय, तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत? असा खोचक सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विचारला. तर हा तुमचा अर्थसंकल्प नाही असंही ठाकरे अजित पवार यांना उद्देशून म्हणाले.

राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची विधानभवनाच्या गॅलरीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी भेट झाली. या भेटीत नमस्कार-चमत्कार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि अजितदादांना टोलेबाजी करण्याची संधी सोडली नाही. काय, तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत? असं ठाकरे फडणवीस यांना म्हणाले. तर हा तुमचा अर्थसंकल्प नाही असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावर उद्धव ठाकरे यांच्यावर काही आरोप झाले होते. त्यात शिवसेनेत पद मिळवण्यासाठी किंवा मदत मिळवण्यासाठी मर्सिडीज घेतल्या जातात. त्यावरून हा टोला आज उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Published on: Mar 10, 2025 05:13 PM