US China Trade War : ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
India China Trade Relations : अमेरिकेकडून चीनला आज दुपारपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आलेला आहे. याचा भारत चीन संबंधांवर सकारात्मक परिणाम होऊन भारत चीन संबंध सुधरण्याची शक्यता आहे.
अमेरिकेकडून चीनला आज दुपारपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आलेला आहे. चीनने अमेरिकेवर लावलेलं अतिरिक्त 34 टक्के आयात शुल्क हटवावं अन्यथा 50 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावणार असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिला आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका उडालेला दिसत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीन, भारतासह 50 देशांवर टेरिफ लागू केला आहे. तर ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्यासाठी चीनने देखील अमेरिकेवर 34 टक्के आयात शुल्क लागू करण्यात आलं आहे. चीनच्या क्षी जिनपींग यांनी घेतलेल्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. चीनने सहकार्य केलं नाही तर 9 एप्रिलपासून नवीन शुल्क लागू होतील असंही ट्रम्प यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या झळा इतर देशांना बसण्याची तीव्र शक्यता आहे. तर दुसरीकडे भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा विचार आहे. तसंच भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर देखील चीन भर देत आहे. त्यामुळे भारत-चीनचे संबंध सुधारतील का? हे पहाणं महत्वाचं ठरेल.
