Operation Sindoor : भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार; अमेरिकेने पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली

Operation Sindoor : भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार; अमेरिकेने पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली

| Updated on: May 07, 2025 | 6:03 PM

US foreign minister rubio : ऑपरेशन सिंदूरनंतर आता अमेरिकेने देखील पाकिस्तानला फटकारलं आहे. शांत रहा गोंधळ घालू नका असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेला आहे.

भारताच्या हल्ल्याला कोणतंही प्रत्युत्तर देऊ नका, असा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भारतासोबत कोणतंही युद्ध करू नका, असाही इशारा आता अमेरिकेने पाकिस्तानला दिलेला आहे.

पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपला बदला घेतलेला आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या 9 अतिरेकी ठिकाणांवर हवाई मिसाईल सोडत भारताने कारवाई केलेली आहे. यात 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेलेले आहेत. त्यावर आता अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री रुबियो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. शांत रहा, काहीही गोंधळ करू नका, अशी चेतावणीच आता अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली आहे.

Published on: May 07, 2025 06:00 PM