Solapur : राज्यात काळू-बाळूचा तमाशा, विनायक राऊतांचा रोष कुणावर..?
राज्यात काळू-बाळूचा तमाशा सुरु आहे असे म्हणत त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. एवढेच नाहीतर एकजण माईक खेचतंय आणि दुसरा त्यांचेच ऐकतंय असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर शिवसेनेमुळे आपण आमदार झालो त्याचा विसर शहाजीबापू पाटलांना पडल्याचे सांगत आगामी निवडणुकीत मतदार त्यांना त्यांची जागा दाखवेल असेही राऊत म्हणाले.
सोलापूर : बंड केलेल्या आमदारांच्या मतदार संघात शिवसेना नेत्यांचे दौरे सुरु आहेत. शिवसंवादच्या माध्यमातून आ. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत तर दुसरीकडे खा. संजय राऊत हे आता ईडीच्या कोठडीत असल्याने खा. विनायक राऊत हे मैदानात उतरले आहेत. विनायक राऊत सोमवारी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यांनी शहाजीबापू पाटील आणि मंत्री तानाजी सावंत यांच्या सडकून टीका केली. शिवाय राज्यात काळू-बाळूचा तमाशा सुरु आहे असे म्हणत त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. एवढेच नाहीतर एकजण माईक खेचतंय आणि दुसरा त्यांचेच ऐकतंय असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर शिवसेनेमुळे आपण आमदार झालो त्याचा विसर शहाजीबापू पाटलांना पडल्याचे सांगत आगामी निवडणुकीत मतदार त्यांना त्यांची जागा दाखवेल असेही राऊत म्हणाले. बंड केलेल्या आमदारांची ओळख ही आता आयुष्यभर गद्दार म्हणूनच राहिल असेही राऊत म्हणाले आहेत.
