Walmik Karad News : कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा; देशमुख कुटुंबाची मागणी
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दादासाहेब खिंडकर यांनी केली आहे.
सीसीटीव्ही डिलिट करून कायदा मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असा आरोप देशमुख कुटुंबाचे प्रतिनिधी दादासाहेब खिंडकर यांनी केला आहे. तर आरोपींना मदत करून कायदा मोडणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं देखील खिंडकर यांनी सांगितलं आहे.
ज्या दिवसापासून वाल्मिक कराड तुरुंगात दाखल झाला आहे. त्या दिवसापासून तुरुंगातील सीसीटीव्ही बंद करण्यात आलेले आहेत. केवळ कराडला मदत करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हे केलेलं आहे. मात्र कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून शिक्षा करावी अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहे, असं दादासाहेब खिंडकर यांनी म्हंटलं आहे.
Published on: Mar 02, 2025 03:52 PM
