नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला? गिरीश महाजनांच्या बॅनरने चर्चांना उधाण

नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला? गिरीश महाजनांच्या बॅनरने चर्चांना उधाण

| Edited By: | Updated on: Mar 02, 2025 | 3:19 PM

Nashik Guardian Minister Issue : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आलेली असतानाच आता नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाचे बॅनर शहरात झळकत असल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत.

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचे लागलेले बॅनर आता चर्चेचा विषय ठरत आहेत. नाशिकच्या सीबीएस चौक परिसरात मंत्री गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकताना दिसत आहेत. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यातच आगामी काळात नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळयाच्या अनुषंगाने आणि नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पन्हा एकदा गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री होतील अशी चर्चा भाजपच्या गोटातून आता सुरू झाली आहे. तसंच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याची देखील आता चर्चा होत आहे. त्यामुळे नाशिकचा पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला का? याचं उत्तर आगामी काळात नाशिककरांना मिळण्याची शक्यता आहे.

Published on: Mar 02, 2025 03:19 PM