Maharashtra News LIVE : संजय राऊत यांच्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेला धोका : शंभूराज देसाई
Maharashtra New LIVE Updates : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर आले आहेत. नव्या सरकारचा आज पहिला दिवस आहे. महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.

निवडणूक निकालानंतर अखेर काल 12 दिवसांनी राज्यात सरकार स्थापन झालं. मुंबईच्या आझाद मैदानात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. “जरी आमची पदं बदलली असली तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही” असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आज नव्या सरकारच पहिला दिवस आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
LIVE NEWS & UPDATES
-
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांंचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते माजी आदिवासी विकास मंत्री होते. नाशिकच्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली आली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ब्रेन स्ट्रोक आल्याने ते दोन महिन्यांपासून रुग्णालयात आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
-
-
शेतकऱ्यांना रोखणे निंदनीय : राहुल गांधी
शेतकरी दिल्लीत येत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊन आपल्या मागण्या सरकारसमोर मांडून आपल्या वेदना मांडायच्या आहेत. मात्र त्यांच्यावर अश्रुधुराचे नळकांडे डागून त्यांना विविध प्रकारे रोखण्याचा प्रयत्न करणे निंदनीय आहे. त्यांच्या मागण्या आणि समस्या सरकारने गांभीर्याने ऐकून घ्याव्यात.
-
मध्य प्रदेश: बारावीच्या विद्यार्थ्याने प्रिन्सिपलची केली हत्या
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे.
-
कुलटली बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा
कुलटली बलात्कार-हत्या प्रकरणी न्यायालयाचा निकाल आला आहे. हत्येनंतर अवघ्या 61 दिवसांत बरुईपीर कनिष्ठ न्यायालयाने दोषी बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
-
-
मनोज जरांगेंचा सरकारला ईशारा
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगेंनी राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला आहे. 5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, असे जरांगे यांनी म्हटले.
-
नाफेडकडून 30 हजार क्विंटल सोयाबीन खरेदी
सोयाबीनची आवक कमी असली तरी बाजारात आणि नाफेडकडून खरेदी सुरू झाली असल्यामुळे शेतकरी नाफेड केंद्रावर आपला माल आणत आहे. जालना जिल्ह्यातील 11 खरेदी केंद्रावर नाफेडकडून 30 हजार क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली.
-
भिवंडीत गोदामास लागली आग
भिवंडी तालुक्यातील राहणाळ गावच्या हद्दीत असलेल्या प्रेरणा कॉम्प्लेक्समधील गोदामाला भीषण आग लागली. या आगीत गोदामातील हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. गोदामात वेल्डिंग चे काम सुरू असताना गोदामात आग लागली.
-
बाबासाहेबांच्या वस्तू पाहण्यासाठी गर्दी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने देशभरात महामानव आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या पुण्यातील सेनापती बापट रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संग्रहालय मध्ये अनेक भिम अनुयायांनी डॉक्टर आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तू पाहण्यासाठी गर्दी केली.
-
संजय राऊत यांच्यापासून ठाकरे गटाला धोका : शंभूराज देसाई
संजय राऊत यांच्यापासून ठाकरे गटाला धोका असल्याचं शिदे शिवेसेनेच्या शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. राऊतांमुळे आमच्यावर ही वेळ आली, असं ठाकरे गटाचे नेते सांगत असल्याचंही देसाई यांनी म्हटलं.
-
वाशिममध्ये जोरदार पाऊस, तुरीच्या आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता
वाशिम शहरासह परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे.या पावसाने वाशिम बाजार समिती मध्ये एकच धावपळ उडाली. पाऊस पडत असल्याने तुरीच्या आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.
-
कालिदास कोळंबकर हे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
कालिदास कोळंबकर हे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असणार आहेत. राज्यपालांनी राजभवनात कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल
नवनिर्विाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल झाले आहेत. काही संवैधानिक प्रक्रिया पार पडणार आहेत. त्याच भाग म्हणून फडणीस राजभवनात पोहचले आहेत. थोड्याच वेळात हंगामी अध्यक्षांचा शपथविधी होणार आहे. कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष असणार आहेत.तसेच नवनिर्वाचित आमदारांचाही शपथविधी होणार आहे.
-
शेतकरी आंदोलनामुळे शंभू सीमेवरील अनेक भागात इंटरनेट बंद
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबाला जिल्ह्यातील शंभू सीमेवरील अनेक भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
-
पराभूत उमेदवारांनी घेतली अजित पवारांची भेट
सुनील टिंगरे,अतुल बेनके आणि राजेश पाटील हे पराभूत उमेदवार अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत.
-
भाजपने काल दिलेल्या जाहिरातीवरून नवा वाद, जाहिरातीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नसल्याने शाहू प्रेमी संतापले
भाजपने काल दिलेल्या जाहिरातीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. आता थांबणार नाही या काल भाजपने दिलेल्या जाहिरातीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नसल्याने शाहू प्रेमी संतापले आहेत.
महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराजांचा फोटो न वापरणे हे सत्ताधाऱ्यांचं जाणीवपूर्वक षडयंत्र असं म्हणत खासदार शाहू छत्रपती यांनी भाजप आणि महायुतीवर हल्लाबोल केला आहे. शाहू प्रेमींकडून शाहू समाधी स्थळावर निदर्शने करत भाजपचा निषेध करण्यात आला.
-
उद्या विशेष अधिवेशनात आमदारांना शपथ दिली जाणार
उद्या विशेष अधिवेशनात आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेच्या क्रमवारीनुसार शपथ दिली जाणार आहे. विधानसभेचे एकूण २८८ प्रतिनिधी उद्या आमदारकीची शपथ घेणार आहेत.
हंगामी अध्यक्षांनी आज शपथ घेतल्यानंतर उद्या विशेष अधिवेशनात आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार.
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदावर भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-
महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसकडून रॅली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसकडून अमरावती ते नया अकोला पर्यत अस्थिकलश रॅलीचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीला सुरुवात झाली.
-
कुणीच हे संविधान बदलू शकत नाही -छगन भुजबळ
बाबासाहेबांमुळे अखंड भारत टिकून आहे. कुणीच हे संविधान बदलू शकत नाही, पंतप्रधानांनीही हे स्पष्ट केलंय. घटना ही लोकशाहीवर आधारीत आहे. लोकांना मतदानाचा अधिकार या घटनेनंच दिलाय. इंदु मिलच्या जागेवर एक जागतिक दर्जाचं भव्य स्मारक उभारलं जातंय, त्याबाबत प्रत्येकजण काहीतरी सतत सुचवत असतो. त्यामुळे थोडा उशिर होणं स्वाभाविक आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.
-
बाबासाहेबांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला-चित्रा वाघ
50% महिलांनी बाबासाहेबांना रोज वंदन केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण जगातली पहिली ही अशी डेमोक्रेसी आहे अगदी पहिल्या दिवसापासून महिलेला मतदानाचा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो बाबासाहेबांनी दिला, असे चित्रा वाघ म्हणाल्या. त्यामुळे या देशातल्या 50% महिला या मेन्स टीम मध्ये आल्या मुख्य प्रवाहात आल्या नाहीतर चूल आणि मूल याच्या पलीकडे महिला गेल्या नसत्या हे अगदी त्रिवार सत्य आहे, असे त्या म्हणाल्या.
-
बिटकॉईनमध्ये मोठी घसरण
जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन तोंडावर आपटले. एकाच दिवसात बिटकॉईन 11 टक्क्यांनी घसरले. गेल्या 24 तासात बिटकॉईनमध्ये 11,900 डॉलरहून अधिकची म्हणजे 10 लाख रुपयांहून अधिकची घसरण दिसून आली. सकाळी 8 वाजून 45 मिनिटांवर बिटकॉईनच्या किंमतीत 5 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली.
-
पिंपळाच्या पानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र
वसई तालुक्यातील भाताने गावच्या चित्रकार कौशिक जाधव यांनी पिंपळा च्या पानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटून अभिवादन केले. ही कलाकृती रेखाटण्यासाठी त्यानंतर एक तासाचा वेळ लागला असून, वॉटर कलर माध्यमातून हे चित्र पूर्ण केले आहे. कौशिक जाधव हे वसईतील न्यू इंग्लिश स्कूल, आर.व्ही.नेरकर या शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
-
वंचितचे ईव्हीएम विरोधी जन आंदोलन
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम विरोधी जन आंदोलन करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वंचितच्यावतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. ईव्हीएम मशीन वर निवडणूक न घेता बॅलेट पेपर वर निवडणूक झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे.
-
सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी
नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आराखड्यात साठ टक्के कपात करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी निधी मिळण्याची शक्यता नसल्याने छानणी केली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कुंभमेळ्याशी निगडित कामांचा समावेश करा अशा मनपाला सूचना दिल्या आहेत. महापालिकेचा अत्यावश्यक आराखडा आता 15000 कोटींवरून 7000 कोटींवर आला आहे. आराखड्यात विविध विभागांच्या माध्यमातून शहरातील विकास कामांचा सहभाग करण्यात आला आहे.
-
Maharashtra News: मुंबईत उद्यापासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन
मुंबईत उद्यापासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन… सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कोळंबकरांकडे हंगामी अध्यक्षपद… भाजपचे कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष…
-
Maharashtra News: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून अभिवादन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून अभिवादन… दिल्लीमधील स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित… संसदेत जाण्यापूर्वी शासकीय निवासस्थानी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
-
Maharashtra News: EVM विरोधात राहुल गांधी मारकडवाडीतून लॉन्ग मार्च काढणार
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची माहिती… सोलापुरात महाविकास आघाडीकडून EVM मशीन फोडून जाळत आंदोलन… सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती समितीने आंदोलनाची हाक दिली होती… यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनची प्रतिकृती फोडण्याचा तसेच जाळण्याचा प्रयत्न केला… काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारडवाडीतून लॉन्ग मार्च काढणार आहेत… मारकडवाडी येथे evm विरोधात पडलेली ठिणगी देशभर वनवा पेटवेल.
-
Maharashtra News: भाजपने शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती – संजय राऊत
भाजपनं राज्यात सुडाचं राजकारण केलं… भाजपने शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती… शिंदेंशिवाय पुढे जा… असं भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं होतं… भाजपच्या सहकाऱ्यांचा वावर मांडलिकांप्रमाणे होता… असं वक्तव्य संजय राऊत यांनी कलं आहे…
-
बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची आजही आमची मागणी – संजय राऊत
तुम्ही जिंकलात तुमचे अभिनंदन करतोय. पण आजही आमची मागणी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. इंडिया आघाडीत फूट पडली असे काहीही नाही. २०१४ ला शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली होती. आम्ही जेव्हा सरकारला विचारतो तेव्हा सरकारकडे उत्तर नसते – संजय राऊत
-
भाजपने एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती – संजय राऊत
भाजपने राज्यात सुडाचे राजकारण केलं. भाजपने एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती. रशिया-युक्रेनप्रमाणे तिघांमध्ये युद्ध आहे. उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावलेले असल्याचे समजताच राजीनामा दिला होता आणि वर्षा बंगला सोडला होता. हे सर्वांनाच जमत नाही – संजय राऊत
-
रोहिणी खडसेंकडून ईव्हीएममधील डेटा पडताळणीसाठी केलेला अर्ज परत मागवला
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुक्ताईनगरच्या पराभूत उमेदवार रोहिणी खडसेंनी ईव्हीएम’मधील डेटाची तपासणी आणि पडताळणीसाठी केलेला अर्ज रद्द करावा आणि भरलेले शुल्क परत मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाला अर्ज सादर केला आहे. रोहिणी खडसे यांनी १६ केंद्रातील ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली होती. त्यानुसार त्यांनी ६ लाख ५५ हजार २०० रुपये शुल्क भरले होते. या प्रक्रियेत व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणीच होणार नसल्याने रोहिणी खडसे यांनी माघार घेत भरलेले शुल्क परत मिळावे म्हणून अर्ज दाखल केला आहे.
रोहिणी खडसे यांचा नव्याने दाखल अर्ज निवडणूक आयुक्तांकडे पाठविला जाणार असून आयोगाच्या निर्णयानंतरच भरलेल्या शुल्काची रक्कम परत मिळणार आहे.
-
EVM विरोधात राहुल गांधी मारकडवाडीतून काढणार लॉन्ग मार्च
सोलापूर – EVM विरोधात राहुल गांधी मारकडवाडीतून लॉन्ग मार्च काढणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी याबद्दलची माहिती दिली. सोलापुरात महाविकास आघाडीकडून EVM मशीन फोडून जाळत आंदोलन करण्यात येणार आहे. सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती समितीने आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनची प्रतिकृती फोडण्याचा तसेच जाळण्याचा प्रयत्न केला.
-
नाशिकच्या हनुमान मंदिरातील दानपेटी चोरीला
नाशिकमधील कपालेश्वर मंदिराबाहेरील हनुमान मंदिरातील दानपेटी चोरीला गेली आहे. कपालेश्वर मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात दानपेटी मोजणी सुरू असताना गुरुवार (ता.०५) दुपारी ही घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. दर्शन घेऊन बाजूला उभे राहिलेल्या संशयिताने पिशवी टाकून दानपेटी चोरली. ही दानपेटी बाजूला घेऊन गेल्यानंतर त्या चोराने तिथून पळ काढला.
-
Dr babasaheb Ambedkar 68th Mahaparinirvan Diwas : आज भारताच्या आर्थिक प्रगतीच सर्व श्रेय संविधानाच – देवेंद्र फडणवीस
“आज आपला देश वेगाने प्रगती करतोय. जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झालाय. आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. याच सर्व श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं, त्याचं आहे. जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि उत्तम संविधान हे भारताच संविधान आहे. कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवण्याच मूलमंत्र घेऊन तयार करण्यात आलय” अशा शब्दात राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाच कौतुक केलं.
-
Dr babasaheb Ambedkar 68th Mahaparinirvan Diwas : जीसको बाबासाहेब मिले वी इंसान हो गया – एकनाथ शिंदे
“कोणीतरी म्हणलं आहे पैसा मिला तो धनवान हो गया, ताकद मिली तो पैलवान हो गया आणि जीसको बाबासाहेब मिले वी इंसान हो गया. मुख्यमंत्री आहेत इथे, त्यांच्या नेतृत्वात आम्ही राज्याला पुढे नेण्यासाठी टीम बनून काम करू राज्याला पुढे नेऊ. संविधानाचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात झाला. प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात संविधान मंदिर बांधण्याची घोषणा आम्ही केलीय आणि त्याचं काम सुरू आहे” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते दादरच्या चैत्यभूमीवरुन बोलत होते.
-
Dr babasaheb Ambedkar 68th Mahaparinirvan Diwas : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चैत्यभूमीवरुन बोलताना म्हणाले….
“बाबासाहेबांच संविधान आपल्यासोबत आहे. आपण इथे माणुसकी धर्म पाळण्यासाठी जमलो आहोत. काल आझाद मैदानात ऐतिहासिक शपथविधी झाला. मंत्रिपदाची आम्ही शपथ घेतली. खरं म्हणजे ती संविधानाची शपथ होती. कालच्या समारंभात बाबासाहेब होते. आजही आपल्यासोबत आहेत. बाबासाहेब कायम आपल्यासोबत आहेत. चंद्र, सूर्य आणि सत्य या सोबत चौथी कायमस्वरुपी आपल्यासोबत असलेली गोष्ट म्हणजे बाबासाहेबांच संविधान” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते दादरच्या चैत्यभूमीवरुन बोलत होते.
-
Pune News : पवना डॅममध्ये बुडून दोघांचा मृत्यू
पुण्यातील पवना डॅममध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो त्यांच्याच मित्रांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमने दोघांचे मृतदेह शोधले आहेत. ही घटना बुधवारी घडली. एकाचा मृतदेह त्याच दिवशी आणि दुसऱ्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी शोधण्यात यश आलं. मयूर भारसाके आणि तुषार अहिरे अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नाव आहेत.
-
Dr babasaheb Ambedkar 68th Mahaparinirvan Diwas : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
Published On - Dec 06,2024 8:28 AM
