Maharashtra News LIVE : उद्धव ठाकरेंसोबत भवितव्य नाही हे राज ठाकरेंना माहितीये : अंजली दमानिया
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

वसईच्या कामन येथील पूरग्रस्त लोकांना रियांश सामाजिक संस्थेकडून जेवण आणि बिस्किट वाटप. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नवीन भोईर आणि त्यांच्या टीमने घरोघरी जावून जेवणाचे वाटप केले. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीचे पाणी अद्यापही वसईच्या ग्रामीण सकल भागातून ओसरलेले नाही. करमाळा तालुक्यातील ब्रिटिशकालीन मांगी तलाव 100 टक्के भरला. मांगी तलाव शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. या तलावाची एकूण पाणी क्षमता एक टीएमसी असून यावर साडेचार हजार क्षेत्र ओलिताखाली येत आहे. मांगी तलाव शंभर टक्के भरल्याने मांगी,वडगाव,पोथरे, निलज यासह उत्तरभागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मांगी तलाव हा ब्रिटिशकालीन तलाव असून तो कान्होळा नदीवरील तलाव आहे. तळोघ ते जुनवणेवाडी रस्त्यावर कोसळली दरड. मातीचा ढिगारा पसरला पूर्ण रस्त्यावर. या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे झाली बंद. रस्त्याचे काम चालू असताना मातीचे उत्खनन केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
कल्याण मध्ये ट्राफिक जाम, प्रवाशांचे हाल
कल्याण मध्ये ट्राफिक जाम
कल्याणच्या पश्चिमेतील सर्व चौकांमध्ये ट्राफिक जाम
मागील एक तासापासून शहरामध्ये ट्राफिक जाम
कल्याण शिलफाटा मार्ग, कल्याण भिवंडी मार्ग, कल्याण उल्हासनगर, कल्याण मुरबाड रोड सर्व रस्ते ट्रॅफिकमुळे जाम
-
कृष्णा नदीची पाणीपातळी 43 फुटांवर, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपातळी सध्या 43 फुटांवर आहे. पाणीपातळी सध्या स्थिर आहे. मात्र तरी खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठी कोणी येऊ नये, गर्दी करू नये, अन्यथा प्रतिबंधक आदेश जारी करावा लागेल असा इशारा पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आला आहे.
-
-
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला
6 वाजल्यापासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 7 फुटांवरून 4 फुटांवर झाले स्थिर
कोयना नदी लगतच्या गावांचे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात
मात्र अजूनही नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच
-
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलिस आयुक्तांना हटवले
गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या आदेशानुसार, वरिष्ठ आयपीएस अधिकारी सतीश गोलचा यांची दिल्ली पोलिसांचे 26 वे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1992 च्या बॅचचे आयपीएस गोलचा यांनी एसबीके सिंग यांची जागा घेतली आहे.
-
कल्याण सिंह यांना भारतरत्न देण्याची मागणी
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना भारतरत्न देण्याची मागणी अलीगढमध्ये केली आहे.
-
-
रेड्डींना विजयी करण्याचा आम्ही प्रयत्न करू: अरविंद केजरीवाल
आपचे दिल्लीतील राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले, “विरोधकांच्या वतीने उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करणारे न्यायमूर्ती रेड्डी यांनीही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. अलिकडेच न्यायमूर्ती (माजी) बी. सुदर्शन रेड्डी मला भेटायला आले होते. देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर दीर्घ चर्चा झाली. निवडणुकीचे गणित आणि रणनीती यावरही दीर्घ चर्चा झाली. रेड्डी यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू. “
-
सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी 43 फुटावर
सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी 43 फुटावर आहे. पाणी पातळी सध्या स्थिर आहे. पाणी वाढल्याने नदी काठी कोणीही येऊ नये. गर्दी करू नये अथवा गुन्हे दाखल करण्यात येतील. अन्यथा प्रतिबंधक आदेश जारी करावा लागेल. असे पोलीस अधीक्षक संदीप घुंगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
-
जळगावात सार्वजनिक गणेश मंडळांना देखील मुसळधार पावसाचा फटका
बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने गणेश मंडळांकडून तयारीला वेग आला आहे. मंडळ तयारी करत असताना मुसळधार पाऊस होत असल्यामुळे गणेश मंडळांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाचे पाणी थेट मंडपात तयारीच्या ठिकाणी साचत असल्यामुळे असल्यामुळे मंडळासमोर अडचणी येत आहे.
-
मुख्यमंत्री रेखा यांच्यावरील हल्ल्याची प्रत्येक पैलूतून चौकशी सुरू
दिल्ली पोलिस मुख्यमंत्री रेखा यांच्यावरील हल्ल्यातील आरोपींची प्रत्येक कोनातून चौकशी करत आहेत. सोशल मीडिया पोस्ट, अयोध्या भेट आणि मोबाईल फोनची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. पोलिस आरोपींच्या जबाबांची पडताळणी करत आहेत आणि कोणत्याही संभाव्य कटाचा तपास करत आहेत. आरोपीने राजकोटमधील त्याच्या गावात 15 ते 20 कुत्रे पाळले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छित होता की तीन लाख कुत्र्यांचे जीव धोक्यात आहेत.
-
माजी कृषीसचिवांनी दिलेली घोटाळ्याची फाईल धनंजय मुंडेंककडून हरवली
धनंजय मुंडेंनी माजी कृषीसचिव व्हि.राधा यांची फाईल गायब केल्याचं म्हटलं जात आहे. फाईलबाबत धनंजय मुंडेंना लेखी उत्तर देण्यास लोकायुक्तांनी सांगितले आहे,
-
प्लास्टिकची पिशवी रस्त्यावर टाकल्याने अजितदाद संतापले
भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यंत्री अजित पवार यांचे फुले देऊन स्वागत केलं. पण त्याची प्लाटिकची पिशवी तशीच रस्त्यात टाकून दिली. त्यावरून अजितदादा चांगलेच संतापले होते. प्लास्टिकची पिशवीवरून त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलच झापलं देखील.
-
संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल खासदार सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया
खासदार सुनेत्रा पवार यांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ” कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये.कारण बैटकीत जाण्याचा उद्देश हा राजकीय नव्हता” असही त्यांनी म्हटलं आहे.
-
उद्धव ठाकरेंसोबत भवितव्य नाही हे राज ठाकरेंना माहितीये : अंजली दमानिया
उद्धव ठाकरेंसोबत भवितव्य नाही हे राज ठाकरेंना माहितीये असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. तसंच राज ठाकरे हे भाजपसोबत जाणार असल्याचंही ते म्हणाले.
-
सायखेडातील धोकादायक पुलाला गोदावरीच्या पाण्याचा स्पर्श
सायखेडातील धोकादायक पुलाला गोदावरीच्या पाण्याचा स्पर्श झाला आहे. या पुलाची उंची अंदाजे 20 ते 25 फूट इतकी आहे. या पुलावरून वाहने नेऊ नये, असं प्रशासनाकडून वाहनधारकांना आवाहन करण्यात आलं आहे.
-
ठाणे जिल्ह्यात भाजपच एक नंबर राहिल, गणेश नाईक यांचा दावा
ठाणे जिल्ह्यात भाजपच एक नंबर राहिल, असा दावा वनमंत्री गणेश नाईक यांनी केला आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच नंबर एक राहिल. पालघर जिल्हा परिषद आणि वसई विरार मनपाही भाजपच्या ताब्यात असेल, असंही नाईक यांनी म्हटलं.
-
मुंबईत 22-23 ऑगस्टला संवाद आणि क्षमता बांधणी परिषद
मुंबईत 22 आणि 23 ऑगस्टला संवाद आणि क्षमता बांधणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त पुढाकाराने हे आयोजन करण्यात आलंय. या परिषदेत देशातील सर्व राज्य महिला आयोगांचा सहभाग असणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित असणार आहेत.
-
मंत्री छगन भुजबळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आखाड्यात
मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. पालकमंत्री नसलो तरी जिल्ह्यातील मंत्री म्हणून बैठक घेण्याचा अधिकार आहे, भुजबळांनी म्हटलं आहे.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर 6 दिवसांतच भुजबळांकडून कुंभमेळ्याचा आढावा घेण्यात येत आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी 15 ऑगस्टला आढावा बैठक घेतली होती.
-
जुन्नर बाजार समितीच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मुख्य कार्यालयाला ठोकलं टाळं
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने खाजगी व्यक्तीकडुन कोट्यावधी रुपयांना जमीन खरेदी केल्या विरोधात जुन्नर तालुक्यातील शेतकरी,महिला आणि सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध मोर्चा काढून बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाला टाळं ठोकलं आहे.
-
नाशिक मध्ये पावसाची विश्रांती
नाशिक मध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. गोदा घाट परिसरात पाण्याची पातळी कमी झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेचाही खाली पाणी आलं. मात्र पाण्याचा विसर्ग वाढल्यास पुन्हा पाण्याची पातळी वाढणार. नाशिकला आज देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
-
बैलपोळ्यानिमित्त राजा सर्जाचा साज खरेदी करण्यासाठी आठवडी बाजारात शेतकरी बांधवांची लगबग
जालना – बैलपोळ्यानिमित्त राजा सर्जाचा साज खरेदी करण्यासाठी आठवडी बाजारात शेतकरी बांधवांची लगबग सुरू आहे. मोठ्या संख्येने शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रकारचे साज आणि साहित्य घेण्यासाठी आठवडी बाजारात दाखल झाले आहेत.
बदनापूर तालुक्यातील गेवराई आठवडी बाजारात बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याची शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.
-
रायगडमध्ये उरणजवळ समुद्रात बोट बुडाली
रायगडमध्ये उरणजवळ समुद्रात एक बोट बुडाली आहे. स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकाकडून ही बोट बाहेर काढण्याचं बचावकार्य सुरू आहे. बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. बोटीमध्ये 7 खलाशी होते, त्या सर्वांना वाचवण्यात यश मिळालं आहे.
-
सुषमा अंधारेंचा नितेश राणेंना टोला
नितेश राणे यांचे कौतुक करायला पाहिजे त्यांना त्यांच्या पूर्वजांचा विसर पडला नाही. वराह जयंतीच्या निमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या सर्व अनुयायांना लक्ष लक्ष शुभेच्छा. नितेश राणे आणि त्यांच्या अनुयायांनी वराह जयंती वराह अवतारात साजरी करावी…! असा टोला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला.
-
चंद्रभागेला पूर
उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उजनी धरणातून एक लाख चाळीस हजार क्यूसेक्स इतका तर वीर धरणातून 40 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. पंढरपूर मंगळवेढा रोडवरील गोपाळपूर येथील जुना दगडी पुलावर पाणी आले आहे.
-
आमदार रोहित पवारांना दिलासा
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचालक्यावर (pr bond) सुटका केली. रोहित पवारांची एमपीएमएलए कोर्टाकडून जातमुचालक्यावर सुटका करण्यात आली. रोहित पवारांना अटक न झाल्याने कोर्टाने त्यांची जातमुचालक्यावर सुटका केली.
-
गोवर्धन ग्रामपंचायत बैठकीत राडा
नाशिक गोवर्धन ग्रामपंचायत बैठकीत राडा झाला. ग्रामसभा सुरू असताना हा राडा झाला. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. विषय मंजुरी वरून राडा झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार-अंजली दमानिया
अतिशय महत्त्वाची सुनावणी झाली, कृषी घोटाळ्याच्या पीआयएलचा हवाला दिला ज्या ऊडवल्या असं बोललं जातंय, यात भ्रष्टाचार झाल्याचं मत मांडलं, वी राधा यांनी जो रिपोर्ट सादर केला तो रिपोर्ट गायब आहे, डेप्युटी सेक्रेटरी यांनीही तेच सांगितलं… धनंजय मुंडे यांनी ती गायब फाईल परत द्यावी असे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी रिप्लाय दिला नाही त्यामुळ् त्यांना झापलंय. धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार , वी राधा यांचा रिपोर्ट गायब केलाय, ती फाईल परत करावी लागणार आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
-
गोदावरी नदीवरील पुलाला पुराचे पाणी
निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर गावाजवळ निफाड-सिन्नर तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाला पाणी टच झाले. नांदूर मधमेश्वर धरणातून 45 हजार 765 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. विसर्गात वाढ झाल्यास पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. पुलावर पाणी असल्यास वाहनधारकांनी आपली वाहने न नेण्याचा इशारा प्रशासनाने दिला.
-
मालेगावात लाखो रुपयांच्या चायना मालाची होळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन द्यावे आणि चायनीज वस्तूंना बहिष्कार करावा असे आवाहन केल्यानंतर मालेगावात व्यावसायिकांनी चायना मालाची होळी केली. या होळीत लाखो रुपयांच्या चायना वस्तू जाळण्यात आल्या. विनोद कुचोरिया या व्यावसायिकाने आपल्या दुकानातून चायनीज वस्तू बाहेर काढून त्यांची होळी केली आणि “आता कधीही चायना वस्तू खरेदी किंवा विक्री करणार नाही” असा ठाम निर्धार व्यक्त केला. यावेळी इतर व्यावसायिकांनीही स्वदेशी वस्तूंवर भर देत चायना मालावर बहिष्काराचे आवाहन केले.
-
चांगल्याला चांगलं म्हणतो-अजित पवार
कुठेही दौऱ्यावर गेल्यावर वित्त नियोजन माझ्याकडे असल्याने मी आढावा घेतो. जिथं चांगलं असेल त्याला मी चांगलं म्हणतो. महसूल बुडला तरी चालेल आम्ही वर्धा जिल्ह्यात दारु बंदी ठेवणार. हा महात्मा गांधी यांचा जिल्हा आहे. बैकायदेशी दारु विक्रीवर आळा घालू असे दादांनी ठणकावले. तर भुजबळ यांनी आढावा घेतल्याबाबत त्यांनी मत व्यक्त केलं.पत्रकारांनो तुम्हाला काय त्रास होतोय. भुजबळ यांनी आढावा घेतला तर. उद्या तुम्ही म्हणाल मी वर्ध्याचा आढावा का घेतला. भुजबळ हे आमचे वरिष्ठ मंत्री आहेत. ते आढावा घेऊ शकतात. कुंभमेळ्याबात कमिटी झाली तर त्यात भुजबळ, दादा भुसे हे असतील. त्यांचा फायदा होईल, असे अजितदादांनी स्पष्ट केले. केंद्राच्या योजनांचा आढावा घेण्याचा अधिकार खासदारांना आहे. जिल्हा नियोजनच्या निधीवर खासदार यांचा अधिकार नाही, असे दादांनी स्थानिक नेत्यांना सुनावले.
-
आमदार नारायण कुचे यांच्याकडून पाहणी
बदनापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि नुकसानग्रस्त भागाची आमदार नारायण कुचे यांच्याकडून पाहणी. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत साधला संवाद आणि नुकसानीची घेतली माहिती
-
वाहतूककोडींने नागरिक त्रस्त
पुण्यातील रहदारीचे मार्ग असलेला गंगाधाम चौक ते मार्केट यार्ड चौकाकडे येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. वाहतूक पोलीस तैनात नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-
भीमा नदीला पूर
भीमा नदीची पाणी पातळी पंढरपूरमध्ये वाढली आहे. या पूर सदृश्य परिस्थितीची खास ड्रोन दृश्ये आपण पाहत आहोत. अर्धी मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. नदीत उतरण्यासाठी असलेले घाटाच्या पायऱ्यांना पाणी लागले आहे. पाणी नदीकाठच्या वसाहतीत शिरले आहे.
-
अंबरनाथमध्ये दुचाकीने घेतला पेट
अंबरनाथमध्ये दुचाकीने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निसर्ग ग्रीन रिलायन्स मार्ट समोर ही धक्कादायक घटना घडली आहे. अग्निशमन दलाने आग विझवली असून या घटनेचा व्हिडीओही पुढे आला आहे.
-
बाहेरून आलेल्या लोंढ्यांमुळे अनेक गोष्टी उभ्या राहिल्या- राज ठाकरे
बाहेरून आलेल्या लोंढ्यांमुळे अनेक गोष्टी उभ्या राहिल्या आहेत, अनेक प्रॉब्लेम्स झाले. प्रयागराजची लोकसंख्या ४० लाख लोक राहतात. काही कोटी गेले तर काय होईल? तिथे जाऊन परत आले. इथे तर राहतात, या शहरांचं काय होणार?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
-
अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा- राज ठाकरे
“अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना. इथे गरजेचं आहे. उद्या ज्या प्रकारच्या जमिनी अदानीच्या घशात घातल्या जाणार आहे. काय होणार आहे धारावीत. कोणते रस्ते होणार आहे. पुण्यासारखी परिस्थिती आहे. पुण्यात जाऊन बघा. थायलंडला जाऊन बघा. फक्त ब्रिज आणि मेट्रोने नाही प्रश्न सुटणार. तुम्हाला वाहने नियंत्रित कराव्या लागतील,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी सुनावलंय.
-
पुढे सण-उत्सव आहेत, वाहतूक कोंडीचा विषय गंभीर- राज ठाकरे
“आताच उपाययोजना केल्या तर परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. टाऊन प्लॅनिंगबाबत तज्ज्ञांशी सरकारनं चर्चा करावी. पुढे सण-उत्सव आहेत, वाहतूक कोंडीचा विषय गंभीर आहे. मुंबईत कायदा मोडणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय,” असं राज ठाकरे म्हणाले.
-
एकदा काही गोष्टी हाताबाहेर गेल्या तर परिस्थिती बिघडू शकते- राज ठाकरे
“फूटपाथला काही रंग असले पाहिजेत. पार्किंगबाबत शिस्त लागली पाहिजे. एकदा काही गोष्टी हाताबाहेर गेल्या तर परिस्थिती बिघडू शकते”, असं राज ठाकरेंनी फडणवीसांना सुचवलं.
-
मूलभूत समस्या सोडवण्याबाबत फडणवीसांशी चर्चा केली- राज ठाकरे
“मुख्यमंत्र्यांकडे शहरांच्या विकासाचा आराखडा दिला. मूलभूत समस्या सोडवण्याबाबत फडणवीसांशी चर्चा केली. गाड्या पार्किंगच्या ठिकाणी वेगवेगळे रंग असावेत,” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.
-
कबुतरं, हत्तींमध्ये अडकतोय, मूलभूत समस्यांकडे लक्ष नाही- राज ठाकरे
मूलभूत समस्यांकडे कोणाचंच लक्ष नाही. कबुतरं, हत्तींमध्ये अडकतोय, मूलभूत समस्यांकडे लक्ष नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सुनावलं.
-
महत्त्वाच्या विषयांवर माझी फडणवीसांशी चर्चा- राज ठाकरे
महत्त्वाच्या विषयांवर माझी फडणवीसांशी चर्चा झाली. अनेक शहरांमध्ये रिडेव्हलपिंगचं काम सुरू आहे. काही महिन्यांपासून त्यांच्याशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू आहे. टाऊन प्लॅनिंग हा माझा आवडीचा विषय आहे.
-
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 50 मिनिटं बैठक
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 50 मिनिटं बैठक झाली. थोड्याच वेळात राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत.
-
कीर्तनकर संग्राम भंडारे यांच्या विरोधात कोथरूड मध्ये बॅनरबाजी…
कीर्तनकर संग्राम भंडारे यांच्या विरोधात कोथरूड मध्ये बॅनरबाजी… ही लढाई तुकारामाविरुद्ध नथुरामाची असल्याचा बॅनर वर उल्लेख… राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पुण्यातील कोथरूडमध्ये बॅनरबाजी..
-
चंद्रभागेच्या पाणी पातळीत सकाळपेक्षा दोन फुटाणे झाली वाढ…….
चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या पुंडलिक मंदिराला पाण्याने दिला वेढा तर पुंडलिक मंदिरा लगत असलेली छोटी मोठी मंदिरे आणि संतांच्या समाध्या गेल्या पाण्याखाली… इस्कॉनने भाविकांसाठी बांधलेला घाट देखील गेला पाण्याखाली… चंद्रभागेच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडल्याने चंद्रभागेच्या पात्रात नौका विहार करण्यास प्रशासनाने घातली बंदी…
-
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फडणवीसांवर जबाबदारी…
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फडणवीसांवर जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती आहे. फडणवीस मविआतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार… NDA च्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चेशी शक्यता…
-
विरार पश्चिम युनिटेक कॉम्प्लेक्स मधील ४० सोसायट्या आठ दिवसापासून पाण्याखाली
तळ मजल्यातील घरात पाणी साचून राहिल्याने रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरात स्विमिंग पूल झाला आज. घरातील बेड, देवघर, मुलांची पुस्तक, बाथरूम, किचन मधील सिलेंडर, सर्व तरंगत आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू बेड सर्व भिजले आहेत. घरात पिण्यासाठी पाणी नाही, बाथरूममध्ये पाणी शिरले, घरात सर्व गटारचे पाणी शिरून दुर्गंधी पसरली आहे.
-
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 50 मिनिटं चर्चा…
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 50 मिनिटं चर्चा झाली आहे. राज ठाकरे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार… ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु असताना राज – फडणवीस भेट…
-
पुराच्या पाण्यात अडकली गाडी आणि ड्रायव्हर…
नाशिक येथे रात्रीच्या सुमारास भगुर इगतपुरी रस्त्यावर घडली घटना… रस्त्याचा अंदाज न आल्याने चालक गाडी सह अडकला पुराच्या पाण्यात… ग्रामस्थांनी केली रेस्क्यू ऑपरेशन… तब्बल 2 तासानंतर सुखरूप काढले बाहेर… थोडक्यात बचावला गाडी चालक.
-
हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्णपणे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भुसावळ: विदर्भात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे सर्व म्हणजेच १४ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून तापी नदीच्या पात्रात ७५ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, ग्रामस्थांनी नदीपात्रात किंवा नदीकाठी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-
सांगलीत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली, रस्ता पाण्याखाली
सांगलीत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर आता कृष्णा नदीचे पाणी शिवशंभो चौकापर्यंत आले आहे. त्यामुळे सांगली पुणे मुंबईला जाणारा बायपास रस्ता पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे.
-
राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, चर्चांना उधाण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु असताना दुसरीकडे या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
-
पंचच निघाला गुन्हातील मुख्य आरोपी
सोलापुरात एका गुन्ह्यातील तपासाचा पंच असलेला व्यक्तीच निघाला आरोपी. बार्शी तालुक्यातील येळंब येथील शेतकरी वैभव काळदाते यांचे सोयाबीनचे 40 पोते माल चोरीस गेला होता. या प्रकरणी गुन्हा पांगरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. याच गुन्हातील चोरीचा घटनास्थळी पंच म्हणून सही करणारा पंच हा गुन्हातील मुख्य आरोपी निघाल्याचा प्रकरण समोर आलय.
-
शिवशंभो चौक पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता
सांगली कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर कृष्णा नदीचे पाणी शिवशंभो चौकापर्यंत आलं आहे. शिवशंभो चौक पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे.
-
भुसावळच्या हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले
सध्या हतनूर धरणातून 75हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. विदर्भात सतत पावसाचा जोर कायम असल्याने हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे हे दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
-
विरारमध्ये सोसायट्या अजूनही पाण्याखाली
विरार पश्चिम युनिटेक कॉम्प्लेक्स मधील 40 सोसायट्या आठ दिवसापासून पाण्याखाली आहेत. तळ मजल्यात गुडगाभर पाणी साचले आहे. जवळपास 500 कुटुंब साचलेल्या पाण्यामुळे बेघर झाले असून, स्वतःचे घर असतानाही नातेवाइक, मित्रांच्या घरी रहायला गेले आहेत. 20 वर्षापासून वस्तीने गजबजलेला युनिटेक कॉम्प्लेक्स आता फक्त सुनसान झाला आहे. इथ माणसांऐवजी सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे आणि त्यात भूत बंगल्या सारख्या इमारती उभ्या आहेत.
-
पुण्यात कोट्यावधी रुपयाचा खर्च पण यंत्रणा पूरस्थितीत फेल
पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षात पुराचे पाणी साचणाऱ्या किंवा पुलावरून पाणी जाणाऱ्या ठिकाणाची सीसीटीव्हीचे नियंत्रण उपलब्ध नाही. कोट्यावधी रुपयाचा खर्च करून कमांड सेंटर उभ्या करणाऱ्या यंत्रणा पूरस्थितीत फेल. रस्त्यावर किंवा चौकात साठणाऱ्या पाण्याची माहिती पोलिसांच्या सीसीटीव्हीतून आपत्ती व्यवस्थापन केंद्राला मिळत आहे. मात्र नदीला पूर आल्यानंतर रहिवासी भागातील स्थिती समजण्यासाठी यंत्रणा अपुऱ्या पडत असल्याचं समोर आलं आहे.
-
उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात दाखल
चंद्रभागा नदी काठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीतील जवळपास 15 ते 20 झोपड्यांमध्ये शिरले पाणी. व्यास नारायण झोपडपट्टीतील 100 कुटुंबांचे प्रशासनाने केले आहे स्थलांतर. स्थलांतरणाच्या ठिकाणी नागरिकांसाठी जेवण, नाश्ता याची व्यवस्था श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि स्थानिक नगरसेवक विक्रम पापरकर यांच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली. दोन लाख क्यूसेकपेक्षा जास्त पाणी सोडले तर पंढरपूर शहरात पाणी घुसण्याचा मोठा धोका असल्याचेही इथापे यांनी सांगितले.
-
Mumbai Rain Update : तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आज विश्रांती
मुंबईत तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने आता थोडी विश्रांती घेतली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले होते. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल झाले. परिसरात रोगराई पसरू नये यासाठी औषध फवारणी करून रोगराईवर नियंत्रण ठेवणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे या सर्व बाबींवर महानगरपालिकेने काटेकोर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
-
Central Railway Train Update : मध्य रेल्वे आजही उशिराने
सतत पडणाऱ्या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. आज देखील ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या गाड्या दहा ते बारा मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या पाच मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे ते वाशी हर्बल लाइन वेळेत लोकल ट्रेन येत आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लोकल पकडण्यासाठी कामावरती जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
Published On - Aug 21,2025 8:20 AM
