AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 3 May 2025 : पाकच्या संरक्षणमंत्र्यांची पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी

| Edited By: | Updated on: May 04, 2025 | 9:02 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 3 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 3 May 2025 : पाकच्या संरक्षणमंत्र्यांची पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी
live breaking

गोव्यात एका धार्मिक यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या अपघातात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. लैराई देवी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना झाली. दरम्यान रेल्वेमार्ग, सिग्नल प्रणाली आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेने आज शनिवार आणि रविवार च्या मध्यरात्री 00.15 ते पहाटे 4.15 या वेळेत चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत सर्व फास्ट लोकल गाड्या सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान स्लो लाईनवर वळवण्यात येणार आहेत. रविवार, 4 मे रोजी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल. खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही रोटेशन पद्धतीने एक दिवस पाणी कपातीचा पुणे महापालिकेने निर्णय घेतला आहे. शहरात एक दिवस रोटेशन पद्धतीने पाणी कपात होणार असून पुणे महापालिकेने वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुंबईतील बांद्रा मातोश्री परिसरामध्ये ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये बॅनरवॉर रंगलं आहे. शिंदेंच्या शिवसेना कडून मैत्री धाग्याची नाही मैत्री वाघाची अशा लावण्यात आले बॅनर. तसेच बॅनरवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना शिवबंधन बांधताना एका बाजूला फोटो तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा फोटो लावत बघताय काय सामील व्हा असे आवाहन शिवसैनिकांना देण्यात आलं आहे. याशिवाय देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेटस वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 May 2025 08:35 PM (IST)

    सासवड पोलीस स्टेशन बाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या

    सासवड पोलीस स्टेशन बाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या

    पोलीस बंदोबस्तात वाढ

    एसपी पंकज देशमुख सासवड पोलीस ठाण्यात दाखल

    पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

  • 03 May 2025 08:02 PM (IST)

    मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांचं बाळ चोरीला

    मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांचं बाळ चोरीला

    शासकीय रुग्णालयातल्या प्रसूती विभागातून 3 दिवसांच्या मुलाची चोरी

    सोलापूर जिल्ह्यातील कविता आलदार या महिलेची तीन दिवसांपूर्वी झाली होती प्रसूती

    दुपारच्या सुमारास बाळ गायब असल्याचा प्रकार आला उघडकीस

    या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपालासा सुरुवात

  • 03 May 2025 07:21 PM (IST)

    पालघरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वनविभागाचा कर्मचारी गंभीर जखमी

    पालघरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वनविभागाचा कर्मचारी गंभीर जखमी

    शैलेश धर्मामेहर असे जखमी वनरक्षकाचे नाव

    रेस्क्यू करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला

    वनविभागाचा निष्काळजीपणामुळे अधिकाऱ्यांना चकमा देऊन बिबट्या फरार

    तलासरी तालुक्यातील धामणगावमधील घटना

  • 03 May 2025 04:53 PM (IST)

    पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या वस्तूंवर निर्बंध

    पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंवर बंदी घातली आहे. भारताने पाकिस्तानसोबत आयात-निर्यात थांबवली आहे.

  • 03 May 2025 04:26 PM (IST)

    रशियाच्या विजय दिनाच्या परेडबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची धमकी

    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मोठी धमकी दिली आहे. विजय दिनाच्या परेडसाठी रशियाला जाणाऱ्या नेत्यांवर युक्रेन हल्ला करू शकते. जागतिक नेत्यांच्या अस्तित्वाची हमी देता येत नाही, असा इशारा झेलेन्स्की यांनी दिला आहे. 9 मे रोजी होणाऱ्या परेडमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक देशांचे शिष्टमंडळही सहभागी होतील.

  • 03 May 2025 04:08 PM (IST)

    जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात प्रशासनाने व्हीपीएन सेवांवर बंदी घातली

    जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात प्रशासनाने VPN सेवांवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

  • 03 May 2025 02:52 PM (IST)

    भारत पाकिस्तानवर लवकरच मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

    INS विक्रांत अरबी समुद्रात तैनात करण्यात आला आहे. INS विक्रांतवरून क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. राफेल मरीन फायटर जेट INS विक्रांतवर तैनात करण्यात आलं आहे. 64 बराक आणि 16 ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा यात समावेश करण्यात आला आहे.भारत पाकिस्तानवर लवकरच मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

  • 03 May 2025 02:35 PM (IST)

    भारताच्या अॅक्शन मोडनंतर हाफिजला पाकिस्तानकडून सुरक्षा

    भारताच्या अॅक्शन मोडनंतर हाफिजच्या हालचालींवर पूर्णपणे बंदी. बिथरलेल्या हाफिजसाठी 3 बुलेटप्रूफ वाहनांचा लवाजमा करण्यात आला आहे. हाफिजसाठी पाकिस्तानकडून खास सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच सध्या हाफिज हा दाट लोकवस्तीत लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. पाकचा आर्मी कॅन्ट परिसर हा हाफिजचा नवा अड्डा असल्याचही म्हटलं जात आहे.

  • 03 May 2025 02:12 PM (IST)

    पाकच्या संरक्षणमंत्र्यांची पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी

    पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे. “भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर पाक हल्ला करेल’ अशी थेट धमकी दिली आहे. तसेच पाकिस्तानने मित्र राष्ट्रांकडे मदत मागितली आहे. सौदी अरब आणि इतर मित्र देशांना पाकिस्तानकडून मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे.

  • 03 May 2025 01:21 PM (IST)

    सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत – अंजली दमानिया

    “एका मोठ्या माणसाने मला सांगितलं होतं की सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत आणि एका बंगल्यावर त्यांची भेट सुद्धा झालेली आहे. माझं केव्हा एवढेच सांगणं आहे की केवळ माहितीच्या आधारावर मी बोललेले आहे. त्यामुळे त्यांनी जरा संयमान घ्यावं” असं अंजली दमानिया म्हणाल्या.

  • 03 May 2025 01:16 PM (IST)

    पुण्यातील नवले ब्रिजवर हिट अँड रन, युवकाचा मृत्यू

    पुण्यातील नवले ब्रिज जवळ एका मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवले. त्यामध्ये कुणाल हुशार याचा मृत्यू. कारमधील चार जणांनी मद्यप्राशन केल्याची माहिती. घटनास्थळी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडून पाहणी. चौघांवरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू.

  • 03 May 2025 12:40 PM (IST)

    Maharashtra Breaking: छगन भुजबळांनी सरकारला दिला घरचा आहेर

    कुंभमेळ्याच्या कामांवरून भुजबळांनी व्यक्त केली नाराजी… कुंभेमेळा निधी, रिंगरोड आणि ईतर कामांवरून भुजबळ झाले संतप्त… फक्त टेंडरवर लक्ष आहे असं म्हणत छगन भुजबळांचा रोख कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांकडे आहे का ? असा प्रश्न.. गोदावरी नदी स्वच्छ करा बाकी काही गरज नाही असा भुजबळ यांनी दिला सल्ला

  • 03 May 2025 12:27 PM (IST)

    Maharashtra Breaking: भारत सरकारचा पाकिस्तानला पुन्हा एक दणका

    पाकिस्तान मध्ये उत्पत्ती झालेल्या किंवा पाकिस्तानशी संबंधित कोणतीही वस्तू भारतात आयात करण्यास बंदी… पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही साहित्य भारतात येणार नाही… केंद्र सरकारचा मोठा निर्णय… पाकिस्तान मधील कोणतीही वस्तू, धान्य भारतात आयात होऊ शकणार नाही…

  • 03 May 2025 12:13 PM (IST)

    Maharashtra Breaking: तलासरी तालुक्यातील धामणगाव आणि करजगाव मधील महिला व पुरुषावर बिबट्या हल्ला

    बिबट्याच्या हल्यात महिला व पुरुष दोघी जखमी… जखमींवर तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू… धामणगाव मधील घराजवळील वाडीत लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू… स्थानिक नागरिक ही लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी उपस्थित

  • 03 May 2025 11:58 AM (IST)

    मोलकरणीने केला 9 लाखांवर हात साफ

    सोलापूरमध्ये मालकाकडे सात वर्षे काम करणाऱ्या मोलकरणीनेच कपाटाचे लॉक तोडून 9 लाखाची रोकड केली लंपास , मालक कार्यक्रमानिमित्त परगावी गेले असताना घराची चावी चोरून चावीवाल्याच्या माध्यमातून कपाटाचे लॉक तोडले. चावीवाल्या व्यक्तीला स्वतःचे घर भासवून कपाटाची चावी हरवल्याचे सांगून लॉक तोडून घेतल्याची माहिती समोर येत आहे. चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • 03 May 2025 11:50 AM (IST)

    शेतकऱ्यांचे चुकारे केव्हा देणार?

    गोंदिया जिल्ह्यात शेतकर्‍यांचे धान खरेदीचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत. शासनाच्या ईएफएमएस आणि बी एम एस प्रणाली मध्ये मोठा घोळ दिसून आला-प्रणालीमुळे अनेक शेतकर्‍यांचे पैसे थकले आहेत.

  • 03 May 2025 11:40 AM (IST)

    उमेश पाटील सुद्धा अजितदादांच्या गोटात

    राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. उमेश पाटील अनेक कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

  • 03 May 2025 11:30 AM (IST)

    मंत्री गुलाबराव पाटील यांची मोठी कबुली

    आम्ही राजकारणी दिवसभर खोटं बोलत असलो तरी सत्याच्या व्यासपीठावर खोटं बोलता येत नाही. एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे संत माहुजी महाराज उत्तराधिकारी गादीपती सोहळा प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटलांची मिश्किल वक्तव्य करत कबुली दिली. राजकारणी लोक कोणाला घाबरत असतील तर फक्त अध्यात्मिक लोकांनाच घाबरतात, असे ते म्हणाले.

  • 03 May 2025 11:20 AM (IST)

    दोन कामगारांचा मृत्यू

    पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या 2 कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला. मृत्यूस जबाबदार असणार्‍या मालकावर गुन्हा दाखल करुन नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली. सोलापूरातल्या अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील दुर्दैवी घटना आहे.

  • 03 May 2025 11:09 AM (IST)

    पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत चिंता

    महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला अचानक भेट दिली. भेट देऊन प्रदूषण नियंत्रणा बाबत महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी सिद्धेश कदम यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली.

  • 03 May 2025 11:00 AM (IST)

    उत्तर भारतात मुसळधार पाऊस, 7 जणांचा मृत्यू

    गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीला पावसाने झोडपून काढले आहे. भर उन्हाळ्यात पावसाच्या या अनामिक एंट्रीने दिल्लीकरांची त्रेधात्रिपीट उडाली आहे. आतापर्यंत मुसळधार पावसाने 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 03 May 2025 10:58 AM (IST)

    उन्हामुळे कांद्याचे नुकसान

    नांदेडचे तापमान 44 अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काढणीनंतर साठवलेला कांदा उष्णतेने नासून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच दुसरीकडे बाजारात कांद्यास पाचशे ते सातशे रुपये क्विंटल इतकाच बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

  • 03 May 2025 10:50 AM (IST)

    अध्यात्मिक व्यासपीठावर खोटे बोलता येत नाही- गुलाबराव पाटील

    आम्ही राजकारणी दिवसभर खोटे बोलत असलो तरी हे सत्याचे अध्यात्मिक व्यासपीठ असल्याने येथे खोटे बोलता येत नाही. त्यामुळे या व्यासपीठावर आम्ही खरे बोलण्याचा प्रयत्न करतो. जळगावमधील एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे संत माहुजी महाराज उत्तराधिकारी गादीपती सोहळा प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही कबुली दिली.

  • 03 May 2025 10:34 AM (IST)

    भिवंडीत महिलीने तीन मुलींसह जीवन संपवले

    भिवंडी शहरात महिलेने तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली. पती रात्रपाळीवर कामावर गेला असताना त्यांनी जीवन संपवले. सकाळी 9 वाजता पती घरी परतल्यावर ही घटना समोर आली. घटनास्थळी भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक दाखल झाले आहे.

  • 03 May 2025 10:15 AM (IST)

    …यामुळे जातनिहाय जनगणनाचा मुद्दा- राऊत

    मोदी पाकिस्तानात घुसरणार असे लोकांना वाटत आहे. घरात घुसून मारण्याची भाषा नरेंद्र मोदी करतात. पण कारवाई होताना दिसत नाही. त्या विषयावरुन लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जातनिहाय जनगणनाचा मुद्दा पुढे आणला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी व्यक्त केले.

  • 03 May 2025 10:12 AM (IST)

    भाजपच्या चेहऱ्यावर दु:ख दिसले नाही- राऊत

    काश्मीरमधील हत्याकांडानंतर भाजपच्या चेहऱ्यावर दु:ख दिसले नाही. युद्धाची चर्चा होत असताना नरेंद्र मोदी ९ तास मुंबईत होते. ते युद्धाला सामोरे जातील, असे वाटत नाही, असे मत शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले.

  • 03 May 2025 10:04 AM (IST)

    राजनाथ सिंह यांचाही रशिया दौरा रद्द

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचाही रशिया दौरा रद्द झाला आहे. ९ मे रोजी मॉस्को येथे होणाऱ्या रशियाच्या विजय दिनाच्या समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होते. परंतु आता त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे.

  • 03 May 2025 09:53 AM (IST)

    हिंगोली -शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री तब्बल 11 पेक्षा जास्त दुकानं फोडली

    हिंगोली – औंढा नागनाथ शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे.  एकाच रात्री तब्बल 11 पेक्षा जास्त दुकानं फोडली.  मुख्य बाजारपेठेतील घटना. चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. घटनास्थळावरून पोलिसांचा पंचनामा सुरू असून चोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

  • 03 May 2025 09:33 AM (IST)

    धुळे – शिरपूर तालुक्यात 25 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त

    धुळे – शिरपूर तालुक्यात 25 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त. पोलीस अधीक्षकांकडून दुसऱ्या दिवशीही कारवाई.

    शिरपूर येथील अति दुर्गम असरपाणी गावाजवळ भागात दुचाकी वर प्रवास करत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची धडक कारवाई. 26 गोण्यांमध्ये 360 किलो ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी शिरपूर येथे 70 लाख रुपयांचा गांजा जप्त केला होता.

  • 03 May 2025 09:25 AM (IST)

    जम्मू काश्मीर खोऱ्यात पावसाचा कहर, अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू

    जम्मू काश्मीर खोऱ्यात पावसाचा कहर असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीनगर जम्मू हायवे काल रात्रीपासून बंद आहे.

    दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये उष्णतेची लाट असताना उत्तर भारतात मात्र पावसाचा कहर सुरू आहे.

  • 03 May 2025 09:16 AM (IST)

    वातील शेतात साठा करून ठेवलेले तब्बल 12 लाख 75 हजार किमतीचे बोगस बियाणे कृषी विभागाने केले जप्त

    जळगावच्या चोपडा तालुक्यातील तावसे गावातील शेतात साठा करून ठेवलेले तब्बल 12 लाख 75 हजार किमतीचे बोगस बियाणे कृषी विभागाने जप्त केले आहे.

    जीवनलाल विश्राम चौधरी यांच्या शेतातून आंब्याचा झाडा खाली गवतात लपून ठेवलेल्या बोगस बियाणाचे 15 पोते पथकाने हस्तगत केले. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

  • 03 May 2025 09:09 AM (IST)

    इंजिनिअरिंग , फार्मसीच्या प्रवेश परीक्षेचा पेपर सोमवारी होणार

    इंजिनिअरिंग , फार्मसीच्या प्रवेश परीक्षेचा पेपर सोमवारी होणार. अभ्यासक्रमात चूक असल्याने 27 तारखेला होणारी परीक्षा रद्द झाली होती. विद्यार्थी आणि पालकांनी सीईटी सेलकडे तक्रार केली होती. यादीमध्ये नाव असलेल्या विद्यार्थ्यांना हा पेपर देणं बंधनकारक आहे. राज्य सामाईक सेलच्या वेबसाईटवर यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

  • 03 May 2025 09:03 AM (IST)

    खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पुण्यात रोटेशन पद्धतीने पाणी कपात

    खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही रोटेशन पद्धतीने एक दिवस पाणी कपातीचा पुणे महापालिकेने निर्णय घेतला आहे. शहरात एक दिवस रोटेशन पद्धतीने पाणी कपात होणार असून पुणे महापालिकेने वेळापत्रक जाहीर केलं आहे.

    जुलै पर्यंत पाणीसाठा आहे जलसंपदा विभागाचं स्पष्टीकरण, तरीही एक दिवस पाणी कपात का असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

Published On - May 03,2025 9:01 AM

Follow us
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.