AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking News Maharashtra LIVE : बारामतीच्या गोविंदा पथकाची धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीला सलामी

| Edited By: | Updated on: Sep 14, 2025 | 1:45 PM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Breaking News Maharashtra LIVE : बारामतीच्या गोविंदा पथकाची धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीला सलामी
live breaking

मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाच्या सरींनी हजेरी लावली असून सकाळीही पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. पावसामुळे दादर वेस्ट परिसरात झाड कोसळून गाडीचं मोठं नुकसान झालं. मुंबईसह उपनगरात पहाटेपर्यंत 400 मिलिमीटरहून अधिकचा पाऊस झाला आहे. अंधेरी सबवे मध्यरात्री बंद पडला, तर पहाटे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन सबवेतील पाण्याला वाट काढून दिली . हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिला आहे. वसई विरार मध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसाने सकल काही भागात पाणी साचले आहे तर भूमिगत गटार ही चेंबर मधून ओहरफ्ल्यू झालेत. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझसह उपनगरातील सर्व भागात पाऊस सुरू आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हाँ ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Aug 2025 09:02 PM (IST)

    बारामतीच्या गोविंदा पथकाची धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीला सलामी

    पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीला बारामतीच्या गोविंदा पथकाकडून पहिली सलामी देण्यात आली आहे.

  • 16 Aug 2025 08:47 PM (IST)

    भांडूपमधील आमदार अशोक पाटील यांच्या दहीहांडीत आगरी-कोळी गीतांची मेजवाणी

    मुंबईतील भांडूपमधील पाटील कंपाऊंड इथे शिवसेना आमदार अशोक पाटील यांच्या दहीहांडीत पारंपारीक आगरी कोळी गीतांची मेजवाणी पाहायला मिळत आहे. या दहीहंडीला थोड्या वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत. आगरी कोळी फेम दादूस यांनी आपल्या शैलीत गाणं सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. तर आमदार अशोक पाटील यांनी इथल्या शिवसेनेला कधीच कुणाचा विरोध होणार नाही, असं म्हटलं.

  • 16 Aug 2025 08:28 PM (IST)

    मंत्री गिरीश महाजन दहीहंडी उत्सवासाठी धुळ्यात

    मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन दहीहंडी उत्सवासाठी धुळ्यात पोहचले आहेत. धुळे शहरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. धुळ्यातील गरुड मैदानात श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या दहीहंडी उत्सवासाठी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री जयकुमार रावळ काही वेळातच उपस्थिती लावणार आहेत.

  • 16 Aug 2025 08:07 PM (IST)

    पुराच्या पाण्यातून जाताना मुरूम भरलेला हायवा ट्रक पलटला

    नांदेडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पुराच्या पाण्यातून जाताना मुरूमने भरलेला हायवा ट्रक पलटला आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत उडी मारली. त्यामुळे चालकाचा जीव बचावला. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील खतगाव इथे हा प्रकार घडला.

  • 16 Aug 2025 07:52 PM (IST)

    निवडणूक आयोग उद्या दिल्लीत पत्रकार परिषद घेणार

    भारतीय निवडणूक आयोग उद्या रविवार (17ऑगस्ट) दुपारी 3 वाजता राष्ट्रीय मीडिया सेंटर, रायसीना रोड, नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेणार आहे.

  • 16 Aug 2025 07:36 PM (IST)

    मुंबईत दहीहंडी फोडताना एका तरुणाचा मृत्यू

    मुंबईत दहीहंडी तोडताना एका तरुणाचा मृत्यू झाला. दहीहंडीची दोरी बांधताना तो तरुण जमिनीवर पडला, असे सांगण्यात येत आहे. मृताचे नाव जगमोहन चौधरी असे सांगण्यात येत आहे. मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील बाल गोविंदा पथकात दुपारी 3 वाजता हा अपघात घडला.

  • 16 Aug 2025 07:29 PM (IST)

    मराठीचा अपमान करेल काय होणार आम्ही दाखवून दिले- संदीप देशपांडे

    आज मराठी माणसांचा सण आहे.  निश्चितपणे महाराष्ट्रात मराठीत चालणार हे आम्ही दाखवून दिलं आहे. मराठीचा अपमान करेल काय होणार हे दाखवलंय. निश्चित निवडणुका असतील परंतु आज सण आहे राजकारणाविषय मी बोलत नाही. मराठी माणूस सणांसाठी एकत्र येत आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे.  हीच मराठी माणसाची खासियत आहे. निवडणुकी संदर्भात सन्माननीय राज साहेब निर्णय घेतील, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

  • 16 Aug 2025 07:18 PM (IST)

    नांदेडमध्ये पूरस्थिती गंभीर, पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

    -नांदेडमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून मराठवाडा – विदर्भाचा संपर्क तुटला आहे.  माहूर – धनोडा संपूर्ण पूल पाण्याखाली गेला आहे. स्थितीपाहून पैनगंगा नदी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 16 Aug 2025 07:09 PM (IST)

    शुभांशू शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ प्रवासावर सोमवारी सभागृहात चर्चा

    ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ प्रवासावर सोमवारी सभागृहात चर्चा होईल. या दरम्यान 2047 मध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात अंतराळ कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर चर्चा होईल. जन विश्वास दुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत सादर केले जाईल. हे विधेयक निवड समितीकडे पाठवले जाईल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सुधारणा विधेयक देखील सोमवारी सादर केले जाईल.

  • 16 Aug 2025 06:54 PM (IST)

    वाशिम: कारंजा शहरात मोकाट गाईचा उच्छाद

    कारंजा शहरातील अमर चौक राम मंदिर रोड परिसरात आज दुपारी मोकाट गाईचा उच्छाद पाहायला मिळाला. एक महिला दोन शाळकरी मुलांसह घरी जात असताना गाईने अचानक झडप घालून तिघांवर जीवघेणा हल्ला केला. पूर्ण घटना cctv मध्ये कैद झाली आहे. या हल्ल्यात आईसह दोन्ही मुले गंभीर जखमी झाले असून नागरिकांनी धाव घेऊन तातडीने दोघांनाही उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 16 Aug 2025 06:42 PM (IST)

    दहीहंडी उत्सवात वसई विरार मध्ये तीन गोविंदा जखमी

    दहीहंडी उत्सवात वसई विरार मध्ये तीन गोविंदा जखमी झाले असून, त्यांच्यावर वसई विरार महापालिकेच्या विजय नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भक्ती चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.

  • 16 Aug 2025 06:28 PM (IST)

    पुण्यात हांडेवाडी येथे धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी महोत्सवाचे आयोजन

    दहीहंडी महोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाला उधाण आलेले पहायला मिळत आहे पुण्यातील हांडेवाडे चौकातील श्री राम चौकात शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांच्यावतीने धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाविकांची गर्दी जमली आहे.

  • 16 Aug 2025 06:25 PM (IST)

    पुण्यात हांडेवाडी येथे धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी महोत्सवाचे आयोजन

    दहीहंडी महोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाला उधाण आलेले पहायला मिळत आहे पुण्यातील हांडेवाडे चौकातील श्री राम चौकात शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांच्यावतीने धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाविकांची गर्दी जमली आहे.

  • 16 Aug 2025 06:13 PM (IST)

    पालघर: महालक्ष्मी मंदिराच्या गडावरील दरड कोसळली

    डहाणू तालुक्यातील विवळवेढे येथील प्रसिद्ध असलेल्या डोंगरावरील महालक्ष्मी मंदिराच्या गडावरील दरड कोसळली . पहाटेच्या सुमाराची ही घटना घडली आहे.या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. गडावर पायी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

  • 16 Aug 2025 06:00 PM (IST)

    शिवडी येथील दहीहंडीमध्ये दोन गटात वाद

    शिवडी येथील दहीहंडीमध्ये दोन गटात वाद

    गोविंदांचे पथक थर लावत असताना झाला वाद

    आयोजक आणि पोलिसांच्या मध्यस्थीने थांबला वाद

    आपापसात वाद झाल्याची आयोजकांनी दिली माहिती

  • 16 Aug 2025 05:55 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात पावसाचा कहर, अनेक गावांना तळ्याचे स्वरुप

    वाशिम जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे, अतिमुसळधार पावसामुळे अनेक गावांना तलावाचं स्वरुप प्राप्त झालं आहे. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र याचा मोठा फटका हा शेतीला बसला असून, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

  • 16 Aug 2025 05:37 PM (IST)

    डहाणू तालुक्यातील विवळवेढेमध्ये कोसळली दरड, मोठं नुकसान

    डहाणू तालुक्यातील विवळवेढे येथील प्रसिद्ध असलेल्या डोंगरावरील महालक्ष्मी मंदिराच्या गडावरील दरड कोसळली आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली . पायी जाण्याच्या मार्गावर गडाचा काही भाग कोसळला . या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे . गडावर पायी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

  • 16 Aug 2025 05:20 PM (IST)

    शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर

    नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

    नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याच्या कृषीमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

    शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्याचा अनुषंगाने कारवाई करू – कृषीमंत्री

    धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

    धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील घोडकी गावाला कृषीमंत्र्यांची भेट

  • 16 Aug 2025 04:58 PM (IST)

    पालघरसह केळवे सफाळे परिसरात जोरदार पाऊस

    पालघर – पालघरसह केळवे सफाळे परिसरात मागील दोन तासांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. मागील दोन तासापासून पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.

  • 16 Aug 2025 04:34 PM (IST)

    ठाणे संकल्प प्रतिष्ठान दहीहंडीत हास्यजत्रेचे कलाकार

    ठाणे संकल्प प्रतिष्ठान आयोजित रवींद्र फाटक यांच्या दहीहंडीमध्ये हास्यजत्रेचे प्रसाद खांडेकर आणि प्रभाकर मोरे हे कलाकार रंगमंचावर हजर

  • 16 Aug 2025 04:23 PM (IST)

    आठ थराचा मानवी मनोरा उभारुन आदित्य ठाकरे यांचे स्वागत

    आठ थराचा मानवी मनोरा उभारत उल्हासनगरातील गोविंद पथकाने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले आहे.

  • 16 Aug 2025 04:11 PM (IST)

    निवडणूक आयोगाची उद्या ३ वाजता पत्रकार परिषद

    निवडणूक आयोगाची उद्या ३ वाजता नवी दिल्लीत  पत्रकार परिषद होणार आहे. राहुल गांधी यांचे आरोप तसेच बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोग काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

  • 16 Aug 2025 03:50 PM (IST)

    वाशिम तालुक्यात ढगफुटी, मोठे नुकसान

    वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून मागील एका तासापासून सध्या संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. वाशिम तालुक्यातील किनखेडा गाव परिसरात आज दुपारी ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील रस्त्यांवर पाणी साचले तर अनेक घरांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असून घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे.

  • 16 Aug 2025 03:40 PM (IST)

    हॉस्पिटलच्या एमआरआयच्या रूमचे सिलिंक कोसळले

    छत्रपती संभाजीनगरमधील घाटी हॉस्पिटलमध्ये न्यू मल्टी स्पेशालिटी बिल्डिंग मधील एमआरआयच्या रूमचे सिलिंक कोसळले, ही बाब कर्मचाऱ्यांच्या सकाळी लक्षात आली. दुर्दैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नसले तरी, घाटी हॉस्पिटलचा निष्काळजी पणा समोर आला आहे..

  • 16 Aug 2025 03:25 PM (IST)

    आम्ही महाराष्ट्रात विकासाचे थर लावतोय; मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांनी व्यक्त केला आनंद

    गोकुळाष्टमी आणि दहीहंडी आपला पारंपारीक सण आहे. थरावर थर लावून दहीहंडी फोडली जाते. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अंगाने सर्वांना एकत्र आणण्याचं ते व्यासपिठ आहे. दहीहंडीची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. त्याच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रात विकासाचे थर लावतोय. लोकाभिमुख सरकार देण्याचा आमचा संकल्प आहे असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

  • 16 Aug 2025 03:07 PM (IST)

    काँग्रेसच्या माजी आमदारच्या लेकाचा भाजपात प्रवेश

    अमरावतीच्या वरुड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे सुपुत्र विक्रम ठाकरे काही वेळातच भाजपात प्रवेश करणार आहे. भाजप नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आपल्या हजारो समर्थकांसह ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

  • 16 Aug 2025 02:30 PM (IST)

    भारतातील सर्वात मोठी दहीहंडी घाटकोपरमध्ये; ऑपरेशन सिंदूर समर्पित ही दहीहंडीचे नियोजन

    भारतातील सर्वात मोठी दहीहंडी घाटकोपरमध्ये लावण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर समर्पित ही दहीहंडी राम कदम यांनी नियोजीत केली आहे. जवानांच्या मनोबल वाढणारी ही दहीहंडी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या कार्यक्रमाला फडणवीसही उपस्थित राहिले.

  • 16 Aug 2025 02:21 PM (IST)

    घाटकोपरमध्ये राम कदमांकडून दहीहंडीचे आयोजन, मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी

    घाटकोपरमध्ये राम कदम यांनी दहीहंडीचे आयोजन केलं आहे. या दहीहंडी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही हजेरी लावली.

  • 16 Aug 2025 01:59 PM (IST)

    चंद्रकांतदादांचा रोहित पवारांना टोला

    आगामी काळात अनेक गोष्टी पूर्ण कराव्यात असं दादा म्हणाले. दादांनी सूचना केली की जिल्हा नियोजनातून १० कोटीचा प्रस्ताव तयार केला. रोहित पवार यांनी ४० लाख दिल्यानंतर ते म्हणाले त्यावर मी एक शून्य वाढवावा. मी एका गिरणी कामगाराचा मुलगा. माझे आई वडील दोन्ही गिरणी कामगार. तुमच्यासारखा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, असा टोला चंद्रकांतदादांनी रोहित पवारांना लगावला.

  • 16 Aug 2025 01:50 PM (IST)

    जयंत पाटलांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार

    सरन्यायाधीश गवई यांनी लक्ष घातलं नसतं तर कोल्हापूरला खंडपीठ झालं नसतं. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असे जयंत पाटील म्हणाले. या कॉलेजला एनडी पाटील यांचं नाव देतोय. आपली जबाबदारी मोठी आहे. मला वाटतं की हा तालुका एनडी पाटलांचं जे व्यक्तिमत्त्व होतं जे वाळवा तालुक्याचा स्वभाव सांगणारी होती.

  • 16 Aug 2025 01:38 PM (IST)

    जमीन वादाची सुनावणी पुढे ढकलली

    अंबाजोगाई सारंगी महाजन यांच्या जमिनीच्या वादाच्या संदर्भात आजची सुनावणी अंबाजोगाई न्यायालयाने पुढे ढकलली. पुढची सुनामी 30 ऑगस्ट रोजी अंबाजोगाई न्यायालयात होणार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माणसाने छत्तीस गुंठे जमीन हडपण्याचा सारंगी महाजन यांचे म्हणणे आहे .धनंजय मुंडे यांच्या सहकार्या कडून फसवणूक केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे

  • 16 Aug 2025 01:26 PM (IST)

    संजय शिरसाट यांचा संजय राऊतांना टोला

    संजय राऊत यांनी जे विधान केले आहे, ते दोन्ही पक्षाचे प्रवक्ते म्हणून केले आहेत का याबद्दल शंका उपस्थित होत आहे, दोन्ही भाऊ एकत्र आले महाराष्ट्राने आनंद साजरा केला, आम्हालाही आनंद झाला, परंतु काल त्यांनी केलेले एका स्टेटमेंटमुळे, आजपर्यंत संजय राऊतने जी काही भाकीत केली आहे, ती भाकीत किती पूर्ण झाली आहेत हा इतिहास आहे, लग्न अजून झालं नाही पण मुलाच्या नावाने बार्शी साजरे करण्याचे काम संजय राऊत करत आहे. नामकरण करण्याची विधी पार पाडण्याचं काम ते करत आहे, असे असताना राज साहेब शांत कसे आहेत हा प्रश्न आहे,असा टोला संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना लगावला.

  • 16 Aug 2025 01:20 PM (IST)

    ओढ्यात चारचाकी कार कोसळली

    धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील ओढ्यात चारचाकी कार कोसळली. कार मधील एका लहान बाळासह चार जण सुखरूप बचावले. खामसवाडी येथील गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत प्रवाशांचे प्राण वाचवले.

  • 16 Aug 2025 01:07 PM (IST)

    ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचा दही हंडी उत्सव

    निष्ठेची हंडी उत्सव एकात्मतेचा उत्सव बालगोपाळाच हे ब्रिद घेत दही हंडीला सुरुवात झाली आहे. ठाण्याच्या जांभळी नाका परिसरात उत्सव साजरा करण्यात येत आहे. आनंद दिघेने सुरू केली दही हंडी सण आज सुरू आहे. तो वारसा माजी खासदार राजन विचारे पुढे नेत आहे.

  • 16 Aug 2025 01:01 PM (IST)

    सारंगी महाजन यांची जमिनीच्या वादासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली

    अंबाजोगाई सारंगी महाजन यांच्या जमिनीच्या वादाच्या संदर्भात आजची सुनावणी अंबाजोगाई न्यायालयाने पुढे ढकलली. पुढची सुनावणी 30 ऑगस्ट रोजी अंबाजोगाई न्यायालयात होणार. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माणसाने छत्तीस गुंठे जमीन हडपल्याच सारंगी महाजन यांचे म्हणणे आहे. धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्याकडून फसवणूक केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे.

  • 16 Aug 2025 01:00 PM (IST)

    भाजपच्या कार्यालयातूनच मतदान झालं पाहिजे -बच्चू कडू

    लढावं की नाही लढावं हाच विचार करतोय. मला वाटतं भाजपच्या कार्यालयातूनच मतदान झालं पाहिजे. मतदान केंद्र सर्व संपवले पाहिजे असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. भाजपच्या कार्यालयामध्येच मत पेट्या ठेवून त्यांनीच बटन दाबावं, असा खोचक टोला कडू यांनी लगावला.

  • 16 Aug 2025 12:52 PM (IST)

    धाराशिवच्या कळंब तालुक्यात ओढ्यात चारचाकी कार कोसळली

    धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील ओढ्यात चारचाकी कार कोसळली. कारमधील एका लहान बाळासह चार जण सुखरूप बचावले. खामसवाडी येथील गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत वाचवले प्रवाशांचे प्राण. चार जणांना सुखरूप वाचवणाऱ्या गावकऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव.

  • 16 Aug 2025 12:26 PM (IST)

    संजय शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल

    “बिर्याणी खाऊन माध्यमातून दाखवले आणि इम्तियाज जलील यांनी आम्हाला डीवचण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ते आहोत ज्यांनी, याच जमिनीत औरंगजेब गाडला आहे” संजय शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल.

  • 16 Aug 2025 12:06 PM (IST)

    चंद्रकांत पाटलांच्या सोन्याच्या चमच्याच्या विधानावरून अजित पवारांचा टोला

    “चंद्रकांत दादा तुम्ही गिरणी कामगार होता असं म्हणाला. आम्ही देखील मुंबईत गेल्यावर दोन खोल्यात रहायचो. आम्ही काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. आम्ही पण कष्ट केले आहेत. पुढे रोहितच्या जन्माच्या वेळी गोष्ट बदलली” चंद्रकांत पाटलांच्या सोन्याच्या चमच्याच्या विधानावरून अजित पवारांचा टोला.

  • 16 Aug 2025 11:53 AM (IST)

    नाशिकध्ये मनसेचा राडा परप्रांतीयांना दिला चोप 

    तीन दिवसांपूर्वी घडली घटना पंचवटी परिसरातील घटना… परप्रांतीय युवक अर्ध नग्न अवस्थेत फिरतात, महिलांची छेड काढत असल्याचे आरोप… गांजाचे सेवन करतात, स्थानिक मराठी नागरिकांवर दादागीरी करतात असा आरोप करत मारहाण केल्याची माहिती… पोलिसांत तक्रार नाही आपापसात वाद मिटवल्याने गुन्हा दाखल नाही…

  • 16 Aug 2025 11:45 AM (IST)

    जळगावच्या धरणगावात मुसळधार पाऊस, मध्यरात्री धरणी नाल्याला मोठा पूर

    मुसळधार पावसामुळे धरणी नाल्याला अचानक पूर येऊन परिसरातील काही घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरले… पूराचे पाणी रस्त्यावरून वेगाने वाहत घरांमध्ये व दुकानांमध्ये घुसले… अनेकांच्या घराच्या बाहेर उभी असलेली दोनचाकी व चारचाकी वाहने पाण्यात अर्धी बुडाल्याचे चित्र दिसून आले… मुसळधार पावसामुळे धरणगाव शहरातील तेली तलावही तुडूंब भरल्याने तलावाचे पाणी थेट रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले

  • 16 Aug 2025 11:30 AM (IST)

    डोंबिवलीत भाजपची ‘मनाची हंडी’, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हंडीचे पूजन

    डोंबिवली शहरातील बाजी प्रभू चौकात ‘डोंबिवलीचा मानबिंदू २०२५’ या नावाने भाजपच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन… ​भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या ‘मनाची हंडी’चे पूजन करण्यात आले… सकाळपासूनच शेकडो गोविंदा पथकांनी या उत्सवाला हजेरी लावली आहे, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. चव्हाण यांनी दहीहंडीसोबतच या उत्सवासाठी उभारलेल्या रंगमंचाचेही पूजन केले. या दहीहंडीला भाजपची ‘मनाची हंडी’ असे संबोधले जात असल्याने, या उत्सवाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • 16 Aug 2025 11:12 AM (IST)

    धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा नदीला पूर

    पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान , सोयाबीन पिकाला मोठा फटका… मांजरा नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध लागला नाही, रेस्क्यू सुरूच… पुराच्या पाण्यात दगावलेली जनावर, शेतीचा नुकसान सर्व गोष्टींच्या पंचनाम्याच्या सूचना

  • 16 Aug 2025 11:02 AM (IST)

    पुण्यातील वाघोली परिसरातून 24 वर्षीय महिला बेपत्ता

    कुणालाही न सांगता ही महिला घरातून बाहेर जाताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. तीन दिवसांपूर्वीच तिची डिलिव्हरी झाली होती. लहान मुलाला सोडून पूजा कुठे गेली असेल याचा शोध वाघोली पोलिसांकडून घेतला जात आहे

  • 16 Aug 2025 10:12 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाचा शेतीला फटका

    बार्शी तालुक्यातील कोरेगावात मोठ्या प्रमाणात शेती नदीच्या प्रवाहात वाहून गेली. बार्शी तालुक्यातील यमाई तलाव झाला ओव्हर फ्लो, त्यामुळे सांडव्यातून सुटलेल्या पाण्याने यमाई नदीचा प्रवाह वाढला.

  • 16 Aug 2025 10:07 AM (IST)

    मुंबई परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे

    रात्री पासून सुरू असणाऱ्या पावसाने रात्री अंधेरी सबवे मध्ये पाणी साचले होते मात्र आता सकाळ च्या वेळेत सबवेतील पाणी हे ओसरले आहे.

  • 16 Aug 2025 09:52 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाचा शेतीला फटका

    सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाचा शेतीला फटका बसला असून – बार्शी तालुक्यातील कोरेगावात शेती मोठ्या प्रमाणा नदीच्या प्रवाहात वाहून गेली.

    बार्शी तालुक्यातील यमाई तलाव झाला ओव्हर फ्लो, त्यामुळे सांडव्यातून सुटलेल्या पाण्याने यमाई नदीचा प्रवाह वाढला.  यमाई नदीचा प्रवाह वाढल्याने,नदी काठच्या शेतीत शिरले पाणी.

  • 16 Aug 2025 09:38 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत फुटणार 325 दहीहंड्या, सेलिब्रिटीही लावणार हजेरी

    कल्याण-डोंबिवलीत 325 दहीहंड्या फुटणार  आहेत. गोविंदांचा जोश वाढवण्यासाठी राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. तसेच कल्याण-डोंबिवलीत कायदा-सुव्यवस्थेसाठी SRPF तुकडीसह 22 निरीक्षक, 71 अधिकारी आणि 600 हून अधिक पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

  • 16 Aug 2025 09:16 AM (IST)

    धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीला पूर

    धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीला पूर आला असून पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.  सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला.

    भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्याकडून शेती नुकसानीची पाहणी करण्यात आली.

  • 16 Aug 2025 09:07 AM (IST)

    पावसामुळे कुर्ला एसटी डेपोसमोरचा रस्ता गेला पाण्याखाली

    पावसामुळे कुर्ला एसटी डेपोसमोरचा रस्ता पाण्याखाली गेला  असून साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  • 16 Aug 2025 09:02 AM (IST)

    रात्रभर पवासानंतर मुंबईत सकाळी पावसाचा जोर कायम, हवामान विभागाच अलर्ट

    मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाच्या सरींनी हजेरी लावली असून सकाळीही पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पाणी साचलं. हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिला आहे.

Published On - Aug 16,2025 8:59 AM

Follow us
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.